दिपूऐवजी सानूचं होणार इंद्रासोबत लग्न; देशपांडे सरांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:30 IST2022-01-12T14:30:00+5:302022-01-12T14:30:00+5:30

Mann udu udu zal: नुकतंच दिपू आणि इंद्रा यांच्यातील प्रेम खुलत आहे. त्यामुळे देशपांडे सरांनी घेतलेल्या निर्णयामुळे या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होईल,

Mann udu udu zal deshpande sir make a big decision about sanika and indra marriage | दिपूऐवजी सानूचं होणार इंद्रासोबत लग्न; देशपांडे सरांनी घेतला मोठा निर्णय

दिपूऐवजी सानूचं होणार इंद्रासोबत लग्न; देशपांडे सरांनी घेतला मोठा निर्णय

'मन उडू उडू झालं' (Mann udu udu zal) या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. देशपांडे कुटुंबातील तीनही मुलींच्या आयुष्यात चढउतार येत आहेत. एकीकडे दिपू आणि इंद्रा यांच्यात नव्याने नातं खुलत आहे. तर, सानिका आणि कार्तिक यांच्या प्रेमाला देशपांडे सरांनी विरोध केला आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या चांगलीच रंजत वळण येत आहेत. या रंजकदार वळणांमध्येच आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे.  देशपांडे सर सानिकाच्या लग्नाचा विचार करत असून ते इंद्रासोबत तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतात.त्यामुळे आता या मालिकेला पुन्हा नवं वळण मिळणार आहे.

इंद्राने दिपूसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण, दिपूने तिच्या मनात प्रेम असूनही अद्याप इंद्राला तिचा निर्णय दिला नाही. यामध्येच सानिका आणि कार्तिक यांचं नातं आई आणि देशपांडे सरांना कळलं आहे. त्यावरुन देशपांडे सर, कार्तिकला घरी भेटायलाही बोलावतात. पण, कार्तिकचं वागणं न पटल्यामुळे ते या लग्नाला नकार देतात.इतकंच नाही तर ते सानिकाच्या लग्नाविषयी एक मोठा निर्णय घेतात.

मन उडू उडू झालं : 'यशकडे बघ आणि शिक जरा'; इंद्रच्या 'या' सीनमुळे मालिका होतीये ट्रोल

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये देशपांडे सर सानिकाचं लग्न कार्तिकऐवजी इंद्रासोबत लावण्याचा निर्णय घेतात. पण, त्यांच्या या निर्णयामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

दरम्यान, नुकतंच दिपू आणि इंद्रा यांच्यातील प्रेम खुलत आहे. त्यामुळे देशपांडे सरांनी घेतलेल्या निर्णयामुळे या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होईल?, दिपू कोणाची साथ देई?, सानिका या लग्नाला तयार होईल का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

Web Title: Mann udu udu zal deshpande sir make a big decision about sanika and indra marriage