लग्न कधी करणार? मुलगी कशी हवीय? 'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतनं दिलं उत्तर, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:05 IST2024-02-13T15:01:43+5:302024-02-13T15:05:54+5:30

अजिंक्य लग्न कधी करणार? हा प्रश्नही अनेकदा चर्चेत येत असतो. याच प्रश्नावर आता अजिंक्य राऊतनं उत्तर दिलं.

'Mann Udu Udu Jala' fame Ajinkya Raut talk about marriage and how he wanted a girl for life partner | लग्न कधी करणार? मुलगी कशी हवीय? 'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतनं दिलं उत्तर, म्हणाला…

लग्न कधी करणार? मुलगी कशी हवीय? 'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतनं दिलं उत्तर, म्हणाला…

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अजिंक्य राऊतची लोकप्रियता देखील दिवसागणिक वाढत आहे.  अजिंक्य राऊतचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या लुकचे, अभिनयाचे अनेक दिवाने आहे. खास करून तरुणींमध्ये तो खूपच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे अजिंक्य लग्न कधी करणार? हा प्रश्नही अनेकदा चर्चेत येत असतो. याच प्रश्नावर आता अजिंक्य राऊतनं उत्तर दिलं आहे.

अजिंक्यने 'कलाकृती मिडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं लग्नावर भाष्य केलं. लग्न कधी करणार आहेस या प्रश्नावर तो म्हणाला, 'माझ्या घरचे खूप मोकळे आहेत. तुला लग्न करायचं किंवा नाही करायचं , असं काहीही असेल तर ते आम्हाला सांग असे म्हणतात. आम्हाला मुलगी शोधायची असेल तर तेही सांग असं माझ्या घरचे म्हणतात. मी माझ्या आजीच्या फार जवळ होतो. माझा वाढदिवस झाला तेव्हा तिला ताज हॉटेलला घेऊन गेलो होते. ती माझ्या लग्नाचा जरा विचार करायची. अंजिक्यचं लग्न करायचं आहे असं ती म्हणायची. पण सध्या माझं तरी कामावर लक्ष आहे'.

लग्नासाठी मुलगी कशी हवीय, या प्रश्नावर अंजिक्य म्हणाला, 'खूपच साधी मुलगी हवी आहे. मी ज्या घरातून आलोय, जिथे मी लहानाचा मोठा झालो. तिथे अगदी साधं वातावरण आहे. अगदी खऱ्या वागणाऱ्या मुलींशी माझी मैत्री झाली आहे. खूप पैसा असलेली किंवा खूप काही शौकीन हवी असं अजिबात नाही. मुळात ती खूपच सिंपल हवी. तिच्यासोबत बसून मला छान गप्पा मारता येतील. किती छान दिसतोय यापेक्षा छान संवाद साधता आला पाहिजे. तसेच थोडीशी सुंदरही हवी'. 

'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विठ्ठल आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेल्या अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अजिंक्यने 'टकाटक २', 'सरी' असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या तो नव्या भूमिकेतून भेटीला येत असतो. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत अजिंक्य राजवीर ही भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत सतत नवनवी वळणे येत असतात.

Web Title: 'Mann Udu Udu Jala' fame Ajinkya Raut talk about marriage and how he wanted a girl for life partner