हमारे जमाने की याद आ गयी! भिडे मास्तर पोहोचले सांगलीत, डोक्यावर गांधी टोपी घालून म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:47 IST2026-01-06T16:47:06+5:302026-01-06T16:47:37+5:30
सांगलीमध्ये मंदार चांदवडकर यांना एक विक्रेते दिसले. डोक्यावर गांधी टोपी घालून ते रस्त्याच्या कडेला बसले होते.

हमारे जमाने की याद आ गयी! भिडे मास्तर पोहोचले सांगलीत, डोक्यावर गांधी टोपी घालून म्हणाले...
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मालिकेत भिडे मास्तरची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर. 'गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी','हमारे जमाने मे...' असे त्यांचे डायलॉग लोकप्रिय आहेत. मंदार चांदवडकर मराठी कुटुंबातीलच असून उत्तम मराठी बोलतात. नुकतेच ते सांगली जिल्ह्यात पोहोचले होते. तिथे एका ८० वर्षीय विक्रेत्या आजोबांशी त्यांनी गप्पा मारल्या. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सांगलीमध्ये मंदार चांदवडकर यांना एक विक्रेते दिसले. डोक्यावर गांधी टोपी घालून ते रस्त्याच्या कडेला बसले होते. समोर लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाणे, बिस्कीट या गोष्टी ते स्वस्तात विकत आहेत. मंदार चांदवडकर म्हणतात, "आपण २०२६ मध्ये आहोत तरी आजही आपल्याला ५-५ रुपयांमध्येही गोष्टी मिळत आहेत. मी सध्या सांगली जिल्ह्यातील बहेगावमध्ये आहे. इथे हे मामा टोपी घालून बसले आहेत.८० वर्षांचे आहेत पण अजिबात वाटत नाही. देव करो तुम्ही असेच स्वस्थ राहा. इथे पाहू शकता... ये हमारे जमाने की चीजे है. लेमन गोळी ५ रुपये...याचीही वेगळीच मजा होती."
मंदार चांदवडकरांचा हा व्हिडीओ पाहून चाहते खूश झाले. 'तुम्ही मराठी चांगली बोलता','ये हमारे जमाने की चीजे है भिडे भाई','मराठी आणि हिंदी बेस्ट कॉम्बिनेशन… आपल्या मराठी माणसांना आणि मराठी संस्कृतीला देशभर पोहचवण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला तर काही अडचण नाही… त्याशिवाय ग्लोबलायझेशन होणार नाही' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.