'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:56 IST2023-01-27T14:45:59+5:302023-01-27T14:56:30+5:30
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच थाटात त्याचा साखरपुडा पार पडला.

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटी लग्नबेडीत अडकत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीहीचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर बाळूमामाच्या नावाने चांगभलं फेम अभिनेता सुमीत पुसावळे विवाह पार पडला. आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता म्हणजे 'मन उडू उडू झालं' फेम ऋतुराज फडके आहे. ऋतुराजने 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता.
ऋतुराज फडकेचा काल साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना खुश खबर दिली आहे. ऋतुराज आता नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टास्टोरीवर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमात पारंपरिक अंदाजात हे जोडपं फारच सुंदर दिसत होतं.
काही दिवसांपूर्वी ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं. मानस कुमार दास दिग्दर्शित या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक ही दिग्गज कलाकार होती.