मन उडू उडू झालं: सानिका प्रेग्नंट असल्याचं सत्य येणार समोर; काय असेल देशपांडे सरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:59 IST2022-03-09T10:59:29+5:302022-03-09T10:59:52+5:30

Man udu udu zala: सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सानिका तिच्या प्रेग्नंसीविषयी दिपूला सांगताना दिसत आहे.

Man udu udu zala The truth that Sanika is pregnant will come to light | मन उडू उडू झालं: सानिका प्रेग्नंट असल्याचं सत्य येणार समोर; काय असेल देशपांडे सरांची प्रतिक्रिया

मन उडू उडू झालं: सानिका प्रेग्नंट असल्याचं सत्य येणार समोर; काय असेल देशपांडे सरांची प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. आतापर्यंत या मालिकेचे अनेक भाग झाले असून प्रत्येक भागात एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत सानिका आणि कार्तिक यांनी केलेल्या लग्नामुळे इंद्रा आणि दिपू यांच्या नात्यावर परिणाम होताना दिसत आहे. इतकंच नाही तर आता सानिका प्रेग्नंट असल्याचं सत्य समोर येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सानिका तिच्या प्रेग्नंसीविषयी दिपूला सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर प्रेग्नंसीचं सत्य समोर आल्यानंतर आई-बाबांना कार्तिक आणि माझ्या लग्नाची माहितीदेखील होईल असं ती दिपूला सांगते.

दरम्यान, सानिकाच्या प्रेग्नंसीचं सत्य ऐकल्यानंतर दिपूच्या पायाखालची जमीन सरकते. मात्र, सानिकावर कितपत खरं बोलतीये याविषयीदेखील दिपूच्या मनात शंका आहे. त्यामुळे सानिका खरंच प्रेग्नंट आहे का? तिचं सत्य समोर आलं तर देशपांडे सरांची प्रतिक्रिया काय असेल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तर मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Web Title: Man udu udu zala The truth that Sanika is pregnant will come to light