Bigg Boss १८ च्या 'वीकेंड का वार'मध्ये आली मल्लिका शेरावत, सलमानला केलं Kiss; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 14:03 IST2024-10-14T14:02:59+5:302024-10-14T14:03:27+5:30

मल्लिका आणि सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Mallika Sherawat appeared in Bigg Boss 18 Weekend Ka Vaar Salman Khan blushed when she kissed him | Bigg Boss १८ च्या 'वीकेंड का वार'मध्ये आली मल्लिका शेरावत, सलमानला केलं Kiss; Video व्हायरल

Bigg Boss १८ च्या 'वीकेंड का वार'मध्ये आली मल्लिका शेरावत, सलमानला केलं Kiss; Video व्हायरल

बिग बॉस १८ (Bigg Boss 18) सुरु होऊन एक आठवडा उलटला आहे. सलमान खानचा नेहमीप्रमाणेच मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. तर यंदाचे स्पर्धकही एकापेक्षा एक आहेत. नुकतंच बिग बॉसचा'वीकेंड का वार'पार पडला. यावेळी सलमान खानसोबत (Salman Khan) स्टेजवर दिसली चक्क मल्लिका शेरावत (Mallika Sherawat). मल्लिकाने भाईजानसोबत फ्लर्ट ही केलं. हे पाहून सलमानही लाजला.

कलर्सने शेअर केलेल्या व्हिडिओत सलमान खान मल्लिका शेरावतचं स्टेजवर स्वागत करतो. केशरी रंगाच्या घागऱ्यात मल्लिका एन्ट्री करते. नंतर ती सलमानसोबत फ्लर्ट करते. 'तू माझ्या डोळ्यात आहे, मनात आहेस.' असं म्हणते. यानंतर ती चक्क सलमानच्या गालावर किस करते. मल्लिकाच्या या कृतीने सलमानही लाजतो. बॅकग्राऊंडला 'दिल दिया गल्ला' हे सलमानचं रोमँटिक गाणं वाजतं. सलमान आणि मल्लिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


मल्लिका शेरानत बऱ्याच काळानंतर हिंदी सिनेमात परतली आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमात मल्लिकाचीही भूमिका आहे. याच्याच प्रमोशनसाठी राजकुमार, तृप्ती आणि मल्लिकाने बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली. मल्लिका आणि सलमानच्या या मजेशीर व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधलं.

Web Title: Mallika Sherawat appeared in Bigg Boss 18 Weekend Ka Vaar Salman Khan blushed when she kissed him