जय भानुशालीपासून घटस्फोट घेतल्याच्या चर्चांवर माही विजनं सोडलं मौन, म्हणाली "मी कायदेशीर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:57 IST2025-10-29T12:54:10+5:302025-10-29T12:57:06+5:30
जय भानुशाली आणि माही विज हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक नात्यामुळे चर्चेत आले आहेत.

जय भानुशालीपासून घटस्फोट घेतल्याच्या चर्चांवर माही विजनं सोडलं मौन, म्हणाली "मी कायदेशीर..."
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोड्यांपैकी एक असलेले जय भानुशाली आणि माही विज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अनेक माध्यमं आणि सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर हे कपल वेगळे होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता या सर्व चर्चांवर माहीने स्वतः मौन सोडले.
सोशल मीडियावर thou.ghtful16' या इन्स्टाग्राम पेजने जय आणि माही यांच्या विभक्त होण्याची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये जय आणि माही यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. तसेच ते मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत शेवटचे एकत्र दिसले होते, असा दावा करण्यात आला होता. या पोस्टवर माही विजने स्वतः कमेंट करत घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. माहीने स्पष्ट शब्दांत कमेंटमध्ये लिहलं, "उगाच खोट्या बातम्या पोस्ट करू नका, मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे".

या पोस्टवरील कमेंटद्वारे माही विजने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल पसरलेल्या अफवांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सिद्ध केलं. जय भानुशाली आणि माही विज यांचं २०११ मध्ये थाटात लग्न झालं. लग्नानंतर ७ वर्षांनी दोघांनी केअरटेकर्सची मुलं खुशी आणि राजवीर यांचं पालकत्व स्वीकारलं. यानंतर त्यांना २०१९ साली तारा ही गोंडस मुलगी झाली. लेकीबरोबरचे अनेक व्हिडीओ दोघं पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्लॉग व्हायरल होत असतात.