Vanita Kharat Birthday : प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:34 IST2022-07-19T17:33:24+5:302022-07-19T17:34:25+5:30
Vanita Kharat Birthday : कोळीवाड्याची रेखा म्हणून ओळखली जाणारी वनिता खरात चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे. वनीच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Vanita Kharat Birthday : प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. यापैकीच एक म्हणजे आपली वनी अर्थात अभिनेत्री वनिता खरात ( Vanita Kharat). तर आज आपल्या लाडक्या वनीचा वाढदिवस बरं का? वाढदिवसानिमित्त वनीवर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होतो आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील टीमनेही वनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) वनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. कोळीवाड्याची रेखा म्हणून ओळखली जाणारी वनिता खरात चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे. वनीच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरने एक जादूचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘जादू चा व्हिडीओ... हा व्हिडीओ ऑन केला की तुम्ही 2 काऊंट मोजा आणि ‘वने sssssss’ अशी जोरात हाक मारा. मग जादू होईल वनी तुमच्याकडे बघेल मग तिला बर्थडे विश करा ....आज आमच्या वनी चा बबड्या चा बड्डे आहे. हॅपी वाला बर्थ डे वनी... आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी... सगळ्यांकडे हक्काने हट्ट करून स्वत:चे लाड पूरवून घेणारी वनी ... वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो आणि आता आहेस तशीच हसत ,खेळत आणि बागडत राहा ....बाकी दाद आहेच.. लव्ह यू वने,’ अशा शब्दांत प्रसाद खांडेकरने वनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर चौगुले यानेही वनीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘1760 सासूबाईमधील वनिता ते आत्ताची हास्यजत्रेतील वनिता... अत्यंत आनंददायी बदल... अत्यंत नॅचरली काम करणारी वनिता प्रत्येक स्किट वाजवते... ऑफ स्क्रिन धुमाकूळ घालणारी वने आमची जान आहे... वने तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,’ अशी पोस्ट समीरने लिहिली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा विनोदी कार्यक्रमातून वनिता रसिकांना हसून हसून लोटपोट करत असते. वनिता आज कमालीची लोकप्रिय आहे. मराठीच नाहीतर हिंदीतही तिने आपले अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.
मात्र खऱ्या आयुष्यात वनिता फारच बोल्ड आहे. तिच्या चाहत्यांना आतापर्यंत यागोष्टीची प्रचिती आलीच असणार. न्युड फोटो शूट करत तिने अक्षरक्षः धुमाकुळ घातला होता. तेव्हापासून वनिता प्रचंड चर्चेत आली होती. फोटोशूटच्या माध्यमातून तिने जसे आहोत तसे स्वतःला स्विकारा आणि स्वतःवर प्रेम करा असाच संदेश दिला होता. अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. तिच्या विविध अंदाजामधील फोटो शेअर करत अक्षरक्षः धुमाकुळ घालत असते.