मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:57 PM2023-08-13T13:57:11+5:302023-08-13T13:59:53+5:30

कोण आहे तो कलाकार?

maharashtrachi hasyajatra nimish kulkarni to make comeback on show after his serial ends | मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (MHJ) हा टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम अनेक महिन्यांनी पुन्हा सुरु होतोय. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आतुरता आहे. पुन्हा एकदा समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे, ओंकार राऊत, गौरव मोरे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर आणि इतर सर्वच धम्माल आणणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी एका कलाकाराचं कमबॅकही होतंय. कोण आहे तो कलाकार?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा शो पहिल्यांदा सुरु झाला तेव्हाच्या काही कलाकारांनी मालिका, चित्रपट करण्यासाठी कार्यक्रमातून एक्झिट घेतली होती. ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, निमिष कुलकर्णी यांचा त्यात समावेश होता. शोमधील काही स्कीट्समध्ये शिवाली परब (Shivali Parab) आणि निमिष (Nimish Kulkarni) यांची केमिस्ट्री हिट झाली होती. निमिषने शो सोडल्यानंतर त्यांच्या जोडीची प्रेक्षकांनी नेहमी आठवण काढली. तर आता निमिष यावेळी शोमध्ये कमबॅक करतोय. समीर चौघुलेच्या एका पोस्टवरुन निमिषच्या कमबॅकच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. समीर चौघुलेंनी शिवाली आणि निमिषसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. याखाली त्यांनी लिहिले,'शिवाली हे खरंय? निमिष कुलकर्णी आणि शिवाली परबसोबत लवकरच येत आहे'

निमिष कुलकर्णीला 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका मिळाली आणि त्याने शो अर्ध्यातच सोडला होता. आता मालिका बंद झाल्याने तो हास्यजत्रेत कमबॅक करतोय. MHJ हा प्रेक्षकांचा लाडका शो कधी परत येतोय याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. प्राजक्ता माळीच यंदाही सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर निमिषच्या कमबॅकमुळे चाहते खूश झालेत. मात्र ओंकार भोजनेलाही परत आणा अशी चाहत्यांनी मागणी केली आहे. 

Web Title: maharashtrachi hasyajatra nimish kulkarni to make comeback on show after his serial ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.