'दादा तू नेहमीच..' 'हास्यजत्रे'तील 'त्या' प्रसंगानंतर रसिकाने लिहिली समीर चौगुलेसाठी खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 18:13 IST2023-04-24T18:10:38+5:302023-04-24T18:13:57+5:30

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक कलाराकाबाबत काही खास प्रसंगी समीर सोशल मीडियावर पोस्ट देखील आवर्जून करत असतो. यावेळी मात्र समीरसाठी रसिका वेंगुर्लेकर ने एक खास पोस्ट शेयर केली आहे.

Maharashtrachi hasyajatra fame rasika vengurlekar shared post for samir choughule | 'दादा तू नेहमीच..' 'हास्यजत्रे'तील 'त्या' प्रसंगानंतर रसिकाने लिहिली समीर चौगुलेसाठी खास पोस्ट, म्हणाली...

'दादा तू नेहमीच..' 'हास्यजत्रे'तील 'त्या' प्रसंगानंतर रसिकाने लिहिली समीर चौगुलेसाठी खास पोस्ट, म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय विनोदी शो घराघरात पोहोचला आहे. या शोचा आणि त्यातील कलाकारांचा कोम चाहता नसेल. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हास्यजत्रेतील सर्वाच कलाकार स्टार झालेत. विनोदांचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक कलाराकाबाबत काही खास प्रसंगी समीर सोशल मीडियावर पोस्ट देखील आवर्जून करत असतो. यावेळी मात्र समीरसाठी रसिका वेंगुर्लेकर ने एक खास पोस्ट शेयर केली आहे. रसिका देखील याच कार्यक्रमाचा भाग आहे. 

आज रसिकाने एक खास पोस्ट करत समीर विषयी एक खास गोष्ट सांगितली आहे. रसिकाने समीर सोबत एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये हास्यजत्रेच्या सेट बाहेर दोघेही उभे असून समीरने रसिकाला एक छान कॅटबरी दिली आहे. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप भावला आहे. सोबतच रसिकाने एक भावनिक कॅप्शन दिले आहे.

रसिका लिहिले, परफॉर्मेन्स आवडला की दादा नेहमीच कौतुक करतो. पण एका विशेष परफॉर्मेन्ससाठी दादाने आवर्जुन हे बक्षिस दिलं…Thank you so much दादा. तु कौतुक करतोस .. चुकाही सांगतोस.. आणि वेळोवेळी Motivate करतोस त्या सगळ्यासाठी. या परफॉर्मेन्सचा राईटर म्हणून हे मी तुझ्याबरोबर शेअर करणार आहे पशा. 

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame rasika vengurlekar shared post for samir choughule