"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:57 IST2023-12-01T17:56:40+5:302023-12-01T17:57:15+5:30

पृथ्वीकसाठी प्रियदर्शनीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar shared special post for prithvik pratap | "P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील कलाकार त्यांच्या विनोदी अभिनयाने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा दूर करत त्यांना खळखळवून हसवतात. प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करणाऱ्या हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांनाही संधी दिली. या शोमुळे पृथ्विक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, ओंकार राऊत, गौरव मोरे हे कलाकार घराघरात पोहोचले. 

हास्यजत्रेमुळे प्रियदर्शनीच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली. प्रियदर्शनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. सध्या प्रियदर्शनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. नुकताच पृथ्विक प्रतापचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पृथ्विकच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने त्याच्याबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत खास पोस्ट लिहिली होती. "हॅपी बर्थडे PP...P फॉर प्रेम, P फॉर प्यार," असं प्रियदर्शनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पृथ्वीकसाठी प्रियदर्शनीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, प्रियदर्शनीने चित्रपटातही काम केलं आहे. 'फुलराणी' या सिनेमात प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिने सुबोध भावेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्येही प्रियदर्शनी झळकली होती. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar shared special post for prithvik pratap