प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 08:25 IST2023-03-08T08:15:06+5:302023-03-08T08:25:45+5:30

Priyadarshini indalkar : ओंकार आणि तिच्याविषयी व्हायरल होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut | प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम  अभिनेता वनिता खरात  (vanita khara) हिचा काही दिवसांपूर्वीच लग्नसोहळा पार पडला. वनिताने प्रियकर सुमित लोंढेसोबत २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा  होत आहे. मात्र, या चर्चांमध्ये अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (priyadarshani indalkar) आणि ओंकार राऊत (onkar raut) या जोडीच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने मौन सोडलं आहे.

अलिकडेच प्रियदर्शनीने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ओंकार आणि तिच्याविषयी व्हायरल होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

"माझा पहिला चित्रपट ती फुलराणी येत आहे. आणि, इतक्या लवकर माझ्याबाबतीत ही कॉनट्रोवर्सी कशी काय घडली? आस्ताद काळेने आमच्या दोङांच्या फोटोवर एक कमेंट केली होती. त्यावर मी गंमतीशीरपणे रिप्लाय दिला. पण, त्या एका कमेंटची एवढी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं.पण, आमच्यात तसं काहीच नाही. आम्ही दोघं  खूप चांगले मित्र आहोत ", असं प्रियदर्शनी म्हणाली.

पुढे ती म्हणते,"काम करताना मैत्री वाढत जाते. पण, लोकांना हे प्रेम वाटत असेल तर, ते त्यांनी केलेलं आमच्यावरचं प्रेम आहे. पण आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे. त्यावर काहीच नाही."

दरम्यान, प्रियदर्शनीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अखेर ओंकार आणि तिच्या अफेअरच्या चर्चांना फूलस्टॉप लागला आहे. वनिताच्या लग्नातील ओंकार आणि प्रियदर्शनीचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात प्रियदर्शनी ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसत होती. तर, ओंकारही तिच्याकडे कटाक्ष टाकताना दिसत होता. त्यामुळे या दोघांमध्ये काही खास नातं असल्याचं म्हटलं जात होतं.
 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut