'एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…'; 'हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापला झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:58 IST2023-07-16T17:58:18+5:302023-07-16T17:58:44+5:30
Prithvik pratap: पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे

'एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…'; 'हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापला झालं तरी काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची टीम सध्या विदेश दौऱ्यावर आहे. या कार्यक्रमातील समीर चौघुले, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, वनिता खरात आणि अन्य कलाकार अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ही कलाकार मंडळी सध्या विदेशातून त्यांचे भन्नाट फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यात खासकरुन पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) याच्या पोस्ट चर्चेत येत आहेत.
अलिकडेच पृथ्वीकने त्याच्या आईविषयी एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे त्याचं कॅप्शन पाहिल्यानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
"एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…बेपरवाही, अय्याशी, नवाबी…पता नहीं क्या क्या करूँगा।", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. सोबतच या पोस्टमध्ये पृथ्वीक Limousine या आलिशान गाडीमध्ये बसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, Limousine या कारमध्ये बसून पृथ्वीकच्या हातात शॅम्पेनचा एक ग्लास आहे. त्यामुळे कॅप्शनमध्ये त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच तो मद्यपान करतोय की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, पृथ्वीक कोणतंही मद्यपान करत नसून त्या ग्लासामध्ये Appy Fizz आहे. तळटीप लिहित त्याने ग्लासामध्ये काय आहे हे सांगितलं आहे. तसंच त्याचे हे निवडक फोटो शिवाली परब हिने काढले आहेत.