"आज ते असते तर...",'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी शेअर केली वडिलांची आठवण, भावुक होत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:08 IST2025-10-03T13:57:34+5:302025-10-03T14:08:47+5:30
प्रभाकर मोरे वडिलांच्या आठवणीत झाले भावूक; म्हणाले...

"आज ते असते तर...",'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी शेअर केली वडिलांची आठवण, भावुक होत म्हणाले...
Prabhakar More: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या विनोदी कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आता लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रभाकर मोरे.आपली खास शैली,कोकणी भाषा आणि विनोदाने हास्याचे फुलोरे उडवणारे प्रभाकर मोरे यांनी अनेक स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कोकणचे पारसमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाकर मोरेंचा मोठा चाहतावर्ग आहे. असं असूनही त्यांना आजही एका गोष्टीची खंत वाटते, एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
नुकतीच प्रभाकर मोरे यांनी 'MHJ Unplugged' ला मुलाखत दिली. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांचं यश पाहण्यासाठी वडील नव्हते, अशी खंत त्यांनी या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, "माझे वडील मला बबन म्हणायचे. मी वडिलांचा खूप लाडका होतो. आज ते असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता."
याचदरम्यान, प्रभाकर मोरे वडिलांची आठवण शेअर करत म्हणाले, "मी शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमात डान्स किंवा अभिनय करायचो, तेव्हा अनेक लोक वडिलांकडे माझ्याबद्दल कौतुक करायचे. अनेक लोक, तुमचा मुलगा खूपच छान काम करतो, खूप छान डान्स करतो म्हणत वडिलांकडे माझं कौतुक करायचे. तेव्हा माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान असायचा. ते एक स्मितहास्य करत माझ्या आईला, आपला बबन पुढे जाऊन मोठा कोणीतरी होईल आणि आपलं नाव उज्ज्वल करेल असं म्हणायचे." अशा भावना त्यांनी मुलाखतीत व्यक्त केल्या.