काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:21 IST2024-09-27T12:20:47+5:302024-09-27T12:21:29+5:30

अमेरिकेच्या रस्त्यावर दिसली शालू, प्रभाकर मोरेंचा हास्यजत्रेतील कलाकारांसह डान्स

maharashtrachi hasyajatra fame prabhakar more dance on shalu song in america watch video | काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला शो आहे. घराघरात हास्यजत्रेचे चाहते आहेत. हास्यजत्रेतील विनोदवीर त्यांच्या अफलातून विनोदाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात. अनेक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळेच प्रसिद्धी मिळाली. सध्या हास्यजत्रेची टीम अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिकेत हास्यजत्रेची टीम धमाल मस्ती करताना दिसत आहे. 

हास्यजत्रेतील कलाकारांचे अमेरिकेतील काही व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओत अमेरिकेच्या रस्त्यावर हास्यजत्रेतील कलाकारांनी डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरजवळ प्रभाकर मोरेंची शालू अवतरलेली पाहायला मिळाली. प्रभाकर मोरेंनी चेतना भटसह "अगं शालू..." हे गाणं म्हणत डान्स केला. या दोघांना रसिका वेंगुर्लेकर आणि नम्रता संभेराव यांनीही उत्तम साथ दिली. अमेरिकेतील रस्त्यांवर प्रभाकर मोरे आणि हास्यजत्रेतील अभिनेत्रींचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 


सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. हास्यजत्रेची टीम अमेरिकेतील प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. अमेरिकेतही हास्यजत्रेचे शो हाऊसफूल होत आहेत. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame prabhakar more dance on shalu song in america watch video