"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:07 IST2024-05-16T12:07:06+5:302024-05-16T12:07:27+5:30

'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे.

maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show | "हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून गौरव घराघरात पोहोचला. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर गौरव आता हिंदी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोनी टीव्हीवरील 'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये सध्या तो काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. 

'मॅडनेस मचाऐंगे' या शोमध्ये नुकतंच मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने हजेरी लावली. यावेळी गौरवने त्याच्या कॉमेडीने मल्लिकाचं पुरेपूर मनोरंजन केलं. याचा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गौरव मल्लिकासमोर बेली डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर तो अंगावर पाणी ओतून घेत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मल्लिकाही गौरवच्या कॉमेडीवर फिदा झाली आहे. पण, नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. 

गौरवचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी नाराज आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

"माकड करुन टाकला राव हिंदीवाल्यांनी...मराठी वाहिनीवर वर होता तेव्हा इतकं वाह्यात केलं नव्हतं", "गौऱ्याचा माकड केलाय", "हो हो हो तुमची कॉमेडी...जोकर झालाय पार तुझा" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

"हास्यजत्रेच स्किट आणि स्क्रिप्ट चांगली असायची", "कशासाठी एवढं? ही कॉमेडी नाही", "हे सर्व करून शांत झोप लागते का...मी तर वेडा झालो असतो", असं म्हणत गौरवला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 
 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show