हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला २५ वर्षांपूर्वीचा फोटो, बघा ओळखता येतंय का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 12:00 IST2023-04-02T11:59:07+5:302023-04-02T12:00:31+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय विनोदी शो घराघरात पोहोचला आहे.

हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला २५ वर्षांपूर्वीचा फोटो, बघा ओळखता येतंय का!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय विनोदी शो घराघरात पोहोचला आहे. या शोचा आणि त्यातील कलाकारांचा कोम चाहता नसेल. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हास्यजत्रेतील सर्वाच कलाकार स्टार झालेत. विनोदांचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. शोमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा हा लहानपणीचा फोटो पोस्ट केलाय. बघा ओळखता येतोय का?
काही दिवसांपूर्वीच सोनी टीव्हीवर सुरु झालेली मालिका 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' लवकरच बंद होतीये. या मालिकेत हास्यजत्रेतील काही कलाकारांनी भूमिका साकारल्या. आता मालिका निरोप घेत असल्याने सर्वच कलाकारांनी आपला २५ वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट केला आहे. ओळखलंत का मग या चिमुकलीला?
नाही ओळखलं? काय सांगता? ही सर्वांची लाडकी वनी म्हणजेच वनिता खरात (Vanita Kharat) आहे. होय. वनिताने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिले, 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा.२ एप्रिल, रविवार रात्री ९ वा. चुकवू नका 'पोस्ट ऑफीस उघडं आहे'चा शेवटचा भाग.'
वनिताच्या या फोटोवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 'किती गोड', 'किती बारिक होतीस बघ', 'हा तुमचा फोटो नाहीच' अशा भन्नाट कमेंट केल्या आहेत.