"गाय झोपली गोठ्यात...", नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:07 IST2024-06-09T16:05:42+5:302024-06-09T16:07:11+5:30

नम्रताने एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नम्रता तिच्या लेकाला अंगाई गाऊन दाखवताना दिसत आहे.

maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao cute video of singing angai for son | "गाय झोपली गोठ्यात...", नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

"गाय झोपली गोठ्यात...", नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली. या शोने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. हास्यजत्रेत तिने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकाही प्रचंड हिट ठरल्या. नम्रताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. 

नम्रता तिच्या लेकाबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसते. नुकतंच तिने एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नम्रता तिच्या लेकाला अंगाई गाऊन दाखवताना दिसत आहे. "गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई...आज माझ्या पाडशाला झोप का गं येत नाही", ही अंगाई नम्रता गात आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने "झोप येतेय तरी गाणं म्हणायचं आहे माझ निरागस बाळ...रुद्राजला अंगाई आवडते आणि त्याला पाठ देखील आहे", असं म्हटलं आहे. 

नम्रता आणि तिच्या चिमुकल्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही नम्रताच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, नम्रताचा पतीदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं नाव योगेश असं आहे. नम्रता आणि योगेशला एक मुलगा असून त्याचं नाव रुद्राज असं आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'नाच गं घुमा' सिनेमात नम्रता मुख्य भूमिका साकारताना दिसली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao cute video of singing angai for son