'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- "गाडी घेतली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:47 AM2024-04-04T10:47:14+5:302024-04-04T10:47:47+5:30

अभिनेत्री चेतना भटने खरेदी केली लाखो रुपयांची नवी कोरी कार, शेअर केली पोस्ट

maharashtrachi hasyajatra fame actress chetna bhatt buys new car tata punch shared post | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- "गाडी घेतली..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- "गाडी घेतली..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. विनोद आणि अभिनय यांची अचूक सांगड घालत हास्यजत्रेतील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांनाही संधी दिली. हास्यजत्रेतूनच अभिनेत्री चेतना भट घराघरात पोहोचली. उत्कृष्ट अभिनय आणि अफलातून अभिनयाने चेतना प्रेक्षकांना खळखळवून हसवते. स्किटमध्ये विविधांगी पात्र साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 

चेतना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच ती वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. नुकतंच चेतनाने नवी कोरी कार घरी आणली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. चेतनाने टाटा पंच ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत सुमारे ८ ते १० लाखांच्या घरात आहे. "आज एक स्वप्न पूर्ण झालं...गाडी घेतली. TATA PUNCH",  असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदन केलं आहे. 

चेतनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. चेतनाचा पती मंदार चोळकरही कलाविश्वात कार्यरत आहे. मंदार प्रसिद्ध गीतकार आहे. मंदारने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ही अनोखी गाठ' सिनेमासाठीही त्याने गाणी लिहिली होती. तर 'दुनियादारी' या गाजलेल्या सिनेमातही त्याची गाणी होती. 
 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame actress chetna bhatt buys new car tata punch shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.