'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेच्या बाईकचा अपघात, गाडीवरचा कंट्रोल सुटला अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:04 IST2026-03-26T12:03:43+5:302026-03-26T12:04:12+5:30
भटकंती करताना निखिलच्या बाईकचा अपघात झाला आहे. ज्यामध्ये त्याला दुखापत झाली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेच्या बाईकचा अपघात, गाडीवरचा कंट्रोल सुटला अन्...; नेमकं काय घडलं?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून निखिल बने घराघरात पोहोचला. निखिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतो. अनेक अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. निखिलने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी बाईक घेतली होती. या बाईकवरुन तो भटकंती करतो. फिरण्याची प्रचंड आवड असल्याने कोकणातील निसर्गरम्य ठिकाणांना तो भेटी देत व्हिडीओतून त्याची झलक चाहत्यांना दाखवतो. अशीच भटकंती करताना निखिलच्या बाईकचा अपघात झाला आहे. ज्यामध्ये त्याला दुखापत झाली आहे.
निखिल बनेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अपघात झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. दापोलीतील मंडणगड येथे निखिल बने फिरायला गेला होता. पण तिथे हिंमतगडावर जाताना त्याच्या बाईकचा अपघात झाला. चढावर जाताना गाडीवरचा कंट्रोल सुटल्याने हा अपघात झाल्याचं निखिल बनेने व्हिडीओत सांगितलं आहे. बाईकचा अपघात झाल्यानंतर जवळच असलेल्या खारी बटर विकणाऱ्या काकांनी आणि जवळच्या गावातील काही महिलांनी त्याला मदत केली. या अपघातात निखिल बने किरकोळ जखमी झाला आहे.
अपघात झाल्यानंतरही माघारी न परतता निखिल बने हिंमतगडावर जातो. गडाचं सौंदर्य आणि त्याची छोटी झलक त्याने व्हिडीओतून दाखवली आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. निखिल हास्यजत्रेतून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करतो.