ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:39 PM2024-03-04T18:39:20+5:302024-03-04T18:40:38+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ऑस्ट्रेलियात कल्ला, ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील व्हिडिओ

maharashtrachi hasyajatra actors made reel on kudiye ni australia beach prajakta mali shared video | ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. हास्यजत्रेचे हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्रातील घराघरात या शोचे चाहते आहेत. केवळ देशातच नव्हे तर भारताबाहेरही या शोची क्रेझ आहे. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची परदेश वारी सुरू आहे. हास्यजत्रेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातही हास्यजत्रेचे शो हाऊसफूल होत आहेत. हास्यजत्रेचे कलाकार ऑस्ट्रेलियातही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. 

ऑस्ट्रेलियातील हास्यजत्रेतील कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाच्या बीचवर हास्यजत्रेचे कलाकार ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत आहेत. 'कुडिये नी' या ट्रेंडिंग गाण्यावर कलाकार थिरकताना दिसत आहेत. प्राजक्ता माळी, वनिता खरात, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समीर चौघुले, पृथ्विक प्रताप यांच्यासह सचिन मोटेदेखील या रील व्हिडिओत कलाकारांबरोबर डान्स करत असल्याचं दिसत आहे. "ऑस्ट्रेलियात जेव्हा वेडे लोक एकत्र येतात...सचिन मोटे सर सुद्धा सामील झाले, याचा विशेष वाला आनंद..", असं कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडिओला दिलं आहे. 

ऑस्ट्रेलियाआधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अमेरिका दौऱ्यावर होती. अमेरिकेतही हास्यजत्रेच्या शोला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतही हास्यजत्रेच्या कलाकारांनी धमाल केली होती. अमेरिकेच्या दौऱ्यावर हास्यजत्रेचे कलाकार कुटुंबीयांसह गेले होते. त्याचे व्हिडिओही त्यांनी शेअर केले होते.  
 

Web Title: maharashtrachi hasyajatra actors made reel on kudiye ni australia beach prajakta mali shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.