दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:26 IST2026-02-05T16:21:28+5:302026-02-05T16:26:04+5:30

लेकाच्या जन्मानंतर हास्यजत्रा फेम दत्तु मोरेने दिली आणखी एक गुडन्यूज! कलाविश्वातून  शुभेच्छांचा वर्षाव

maharashtrachi hasya jatra fame dattu more started new business share good news with fans | दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Dattu More: महाराष्ट्राची हास्यजत्रा या  कार्यक्रमाचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. या विनोदी कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना घराघरात ओळख मिळवून दिली. त्यातीलच एक नाव म्हणजे दत्तू मोरे. आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दत्तू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच काही महिन्यापूर्वीच घरी नव्या सदस्याचं आगमन झालं. लेकाच्या जन्मानंतर आता अभिनेत्याने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


दत्तू मोरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता  म्हणून ओळखली जातो. नुकतंच  दत्तू मोरेनं व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे. त्याने ठाण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. 'Daily Bowl' या नावाने त्याने क्लाऊड किचन सुरू केलं आहे.  या क्लाऊड किचनच्या माध्यमातून लोकांना ताजे आणि सकस अन्न देण्याचा दत्तूचा प्रयत्न आहे.

दरम्यान,  सोशल मीडियाद्वारे ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title : दत्तू मोरे: हास्य कलाकार से उद्यमी, नया रेस्टोरेंट व्यवसाय शुरू

Web Summary : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' से प्रसिद्ध दत्तू मोरे ने ठाणे में 'डेली बाउल' नामक क्लाउड किचन खोला। उनका लक्ष्य ताजा, पौष्टिक भोजन प्रदान करना है, जिसके लिए उन्हें प्रशंसकों और कलाकारों से सराहना मिली।

Web Title : Dattu More: From Comedy Star to Budding Restaurant Entrepreneur

Web Summary : Comedian Dattu More, known for 'Maharashtrachi Hasyajatra,' has launched 'Daily Bowl,' a cloud kitchen in Thane. He aims to provide fresh, nutritious food, receiving praise and best wishes from fans and fellow artists.