'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:23 IST2024-12-28T11:19:46+5:302024-12-28T11:23:05+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 'Maharashtrachi Hasya Jatra' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..."
Prithvik Pratap: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 'Maharashtrachi Hasya Jatra' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. आपली अतरंगी स्टाईल आणि अभिनयाने पृथ्वीकने चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांच्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अलिकडेच पृथ्वीक प्रतापने त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. २५ ऑक्टोबरच्या दिवशी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. सध्या पृथ्वीकचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओद्वारे त्याने प्राजक्ता आणि त्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. पृथ्वीकने त्याची बायको प्राजक्ताला वाढदिवसानिमित्त हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीक प्रतापचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पृथ्वीक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच पृथ्वीक प्रतापने त्याची पत्नी प्राजक्तासाठी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलंय की, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता. वयाच्या तिशीत तुझं स्वागत." असं मजेशीर कॅप्शन देत त्याने बायकोला विश केलं आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अभिनेता पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पृथ्वीक प्रतापने लग्नाची कोणतीही माहिती न देता थेट बायकोबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना थक्क केले होते. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याने लग्न केलं.