प्रयोग पाहायला आली अन्...; नाटकाच्या सेटवर हास्यजत्रेतील अभिनेत्याला चाहतीने घातलेली लग्नाची मागणी, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:32 IST2026-03-05T14:28:26+5:302026-03-05T14:32:04+5:30

"तुमचं लग्न झालंय का? नसेल तर...", नाटकाच्या प्रयोगादरम्यान हास्यजत्रेतील  अभिनेत्यासमोर चाहतीने ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव, म्हणाला...

maharashtrachi hasya jatra fame actor prathamesh shivalkar share that funny moment when a girl fan proposed him for marriage | प्रयोग पाहायला आली अन्...; नाटकाच्या सेटवर हास्यजत्रेतील अभिनेत्याला चाहतीने घातलेली लग्नाची मागणी, काय घडलेलं?

प्रयोग पाहायला आली अन्...; नाटकाच्या सेटवर हास्यजत्रेतील अभिनेत्याला चाहतीने घातलेली लग्नाची मागणी, काय घडलेलं?

Prathamesh Shivalakar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमाने आजवर अनेक विनोदी कलाकारांना घराघरांत पोहोचवले आहे. त्यामुळेच या शोमधील कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता प्रथमेश शिवलकर.आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रथमेशसोबत नुकतीच एक रंजक घटना घडली. एका महिला चाहतीने त्याला थेट नाटकाच्या प्रयोगादरम्यान लग्नाची मागणी घातली होती. प्रथमेशने स्वतः एका मुलाखतीदरम्यान याबद्दल उलगडा केला आहे.

प्रथमेश शिवलकर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याचे स्किट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. प्रथमेश सध्या त्याच्या आगामी नाटकामुळे चर्चेत असून त्याचं 'थेट तुमच्या घरातून' हे नाटकही रंगभूमीवर चांगलंच गाजतंय. नुकताच त्याने कलाकृती म़ीडियासोबत संवाद साधला. दरम्यान, त्याने नाटकांत काम करताना त्याच्यासोबत घडलेले प्रसंग शेअर केले. या मुलाखतीदरम्यान प्रथमेश शिवलकर म्हणाला की,"आता हास्यजत्रेमुळे मला घराघरांत पम्या म्हणून ओळखतात. मी आता जे नाटक करतोय 'थेट तुमच्या घरातून' त्यामध्ये जेव्हा एन्ट्री घेतो मी,  एन्ट्री घेतल्यानंतर प्रेक्षकांमधून पम्या असा आवाज येतो. माझ्या एन्ट्रीनंतर मी पाच सेकंद थांबतो आणि तो आवाज ऐकल्यानंतर वाटतं, चला आपली लोकं आलेली आहेत."

यावेळी प्रथमेशला " तुला या प्रवासात मिळालेली वेगळी अशी कॉम्प्लिमेंट कोणती आहे. जी कायम तुझ्या लक्षात राहिली?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने सांगितलं,"नाटक झाल्यावर अनेक चाहते, मुल-मुली भेटतात. तेव्हा एका मुलीने अत्यंत साध्या पण थेट शब्दांत विचारलं, अरे! तू छान दिसतोस. तुमचं लग्न झालंय का? नसेल तर कराल का? पण ते मी फक्त कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं  होतं. कारण, समोरच्याला आपला अभिनय, आपलं व्यक्तिमत्व आवडलेलं असतं. त्यामुळे आपण समोर दिसल्यावर आपसूक येतं. मला त्या कॉम्प्लिमेंट मधला तिचा बिनधास्तपणा आवडला." असं त्याने सांगितलं. 

प्रथमेशने ही संपूर्ण घटना अत्यंत खेळकर आणि सकारात्मक पद्धतीने हाताळली. त्याने या अनुभवाचा उल्लेख करताना चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामुळे प्रथमेशच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. त्याच्या या मजेशीर अनुभवाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, त्याचे चाहते यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title : हास जत्रा अभिनेता प्रथमेश शिवलकर को सेट पर प्रशंसक ने शादी का प्रस्ताव दिया।

Web Summary : 'महाराष्ट्रची हास्य जत्रा' से मशहूर प्रथमेश शिवलकर को नाटक के दौरान एक प्रशंसक ने शादी का प्रस्ताव दिया। उन्होंने इस मजेदार घटना को साझा किया और प्रशंसक की हिम्मत की सराहना की, इसे अपने अभिनय और व्यक्तित्व की प्रशंसा के रूप में लिया।

Web Title : Fan proposes marriage to Hasya Jatra actor Prathamesh Shivalkar on set.

Web Summary : Prathamesh Shivalkar, known from 'Maharashtrachi Hasya Jatra,' received a marriage proposal from a fan during his play. He shared the amusing incident, appreciating the fan's boldness and taking it as a compliment to his acting and personality.