महाभारतातील शकुनीमामा एकेकाळी सैन्यात करायचे नोकरी, 'अशी' झाली अभिनयात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 15:47 IST2023-10-13T15:42:52+5:302023-10-13T15:47:42+5:30

गूफी पेंटल हे अभिनय विश्वात येण्यापूर्वी भारतीय लष्करात कार्यरत होते हे फार कमी जणांना माहिती आहे. 

Mahabharat shakuni mama gufi paintal know his carrer films roles first job everything | महाभारतातील शकुनीमामा एकेकाळी सैन्यात करायचे नोकरी, 'अशी' झाली अभिनयात एन्ट्री

महाभारतातील शकुनीमामा एकेकाळी सैन्यात करायचे नोकरी, 'अशी' झाली अभिनयात एन्ट्री

महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारुन गूफी पेंटल घराघरात पोहोचले. गुफी यांनी 1975 मध्ये 'रफू चक्कर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ते 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसले. मात्र, गूफी यांनी खरी ओळख मिळाली ती 1988 मध्ये बीआर चोप्रा यांच्या सुपरहिट शो 'महाभारत'तातून. यात त्यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती. गूफी शेवटचे स्टार भारतच्या 'जय कन्हैया लाल की' शोमध्ये दिसले होते. ५ जूनला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गूफी पेंटल हे अभिनय विश्वात येण्यापूर्वी भारतीय लष्करात कार्यरत होते हे फार कमी जणांना माहिती आहे. 

अभिनय विश्वात येण्यापूर्वी गूफी हे भारतीय लष्करात होते. दैनिक भास्करला एका मुलाखतीत त्यांनी आपला लष्कारातील नोकरी ते शकुनी बनण्याच्या प्रवासाबाबत सांगितले होते. ते म्हणाले होते की, "1962 मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होते, तेव्हा मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो. युद्धाच्या दरम्यान कॉलेजमध्ये सैन्य भरती सुरू होती. मला नेहमी सैन्यात जायचं होते. माझं पहिलं पोस्टिंग भारत-चीन सीमेवर झाले होतं.''

पुढे ते म्हणाले होते, सीमेवर मनोरंजनासाठी टीव्ही आणि रेडिओ नव्हता, त्यामुळे आम्ही (लष्कराचे सैनिक) सीमेवर रामलीला करायचो. रामलीलामध्ये मी सीतेची भूमिका करत असे आणि रावणाच्या वेशात एक व्यक्ती स्कूटरवर येऊन माझे अपहरण करायचा.  मला अभिनयाची आवड होती, थोडं प्रशिक्षण ही घेतलं होतं.''  अभिनयाची आवड वाढू लागली तेव्हा गुफी १९६९ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ कंवरजीत पेंटल यांच्या सांगण्यावरून मुंबईत आले. मॉडेलिंग आणि अभिनय शिकला आणि अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. याच दरम्यान बीआर  चोप्रा यांच्या महाभारतात कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

मी महाभारतातील शकुनीच्या  भूमिकेसाठी योग्य चेहऱ्याच्या शोधत होतो. मी या शोसाठी सर्व पात्रांचे ऑडिशन घेतले होते. या भूमिकेसाठी मी तीन जणांची निवड केली होती. दरम्यान, शोची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मासूम रझाने माझ्याकडे पाहिले आणि मला शकुनीची भूमिका करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे मी महाभारताचा मामा शकुनी झालो.
 

Web Title: Mahabharat shakuni mama gufi paintal know his carrer films roles first job everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.