मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 16:13 IST2024-05-16T16:13:13+5:302024-05-16T16:13:35+5:30
Madhurani gokhale: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे.

मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे ती कायमच नेटकऱ्यांचं मन जिंकत असते. मधुराणीचा सोशल मीडियावरही वावर आहे. त्यामुळे ती अनेकदा चाहत्यांच्या भेटीला येते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका नव्या लूकमध्ये दिसत असून तिचा हा नवा अंदाज चाहत्यांना आवडला आहे. गुलाबी रंगाच्या coord set मध्ये मधुराणीने व्हिडीओशूट केलं आहे. यावेळी लापता लेडीज सिनेमातील गाणं बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, मधुराणी बऱ्याचदा काही ब्रँडचं प्रमोशन करतांना दिसते. हे व्हिडीओशूट देखील एका प्रमोशनचाच भाग आहे. Poshaaq या कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने हे व्हिडीओशूट केलं आहे.