एम सी स्टॅन ने सोडलं रॅप, पोस्ट शेअर करत दिली माहिती; चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:00 AM2024-04-09T11:00:31+5:302024-04-09T11:01:44+5:30

एम सी स्टॅनला नक्की झालं काय?

M c Stan quits rap shares post on instagram deletes it after some time fans are confused | एम सी स्टॅन ने सोडलं रॅप, पोस्ट शेअर करत दिली माहिती; चाहते संभ्रमात

एम सी स्टॅन ने सोडलं रॅप, पोस्ट शेअर करत दिली माहिती; चाहते संभ्रमात

रॅपर म्हणून प्रसिद्ध झालेला एम सी स्टॅन (M C Stan) आता रॅपच सोडणार असल्याचं कळतंय. एम सी स्टॅनने स्वत:च इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रॅप सोडत असल्याची माहिती दिली. त्याच्या लोकप्रियतेच्या जोरावरच तो 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी झाला होता. इतकंच नाही तर तो विजेताही ठरला. पण आता एम सी स्टॅन रॅपच सोडणार असल्याचं त्याने लिहिल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. शिवाय नंतर त्याने स्टोरी डिलीटही केली. 

एम सी स्टॅनचं रॅप हेच कौशल्य आहे. त्याची अनेक रॅप गाणी गाजली आहेत. तो लाईव्ह कॉन्सर्ट्सही करतो. चाहतेही त्याचे प्रचंड चाहते आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेला एम सी स्टॅन रॅप का सोडतोय असाच प्रश्न चाहत्यांना पडलाय. असं काय झालं की त्याने ही पोस्ट केली आणि नंतर डिलीटही केली? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ही कोणती प्रमोशनल अॅक्टिव्हिटी किंवा पब्लिसिटी स्टंट आहे का असाही अनेकांचा अंदाज आहे.

गेल्या महिन्यातच एम सी स्टॅनचं युट्यूब चॅनल हॅक झालं. त्याने मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी झोपलेलो होतो, मध्यरात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिलं की माझ्या युट्यूबवर लाईव्ह सेशन सुरु आहे." आता स्टॅनच्या पुढच्या पोस्टची चाहते वाट पाहत आहेत. मागची पोस्ट नक्की काय होती, का केली याबाबत त्याच्याकडून उत्तर ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: M c Stan quits rap shares post on instagram deletes it after some time fans are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.