मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रामध्ये फुललं प्रेम? गर्लफ्रेंड नाझिलाची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:54 IST2023-11-20T15:45:39+5:302023-11-20T15:54:58+5:30

मुनव्वर फारुकी आणि प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. 

Love blossomed between Munavwar Farooqui and Mannara Chopra? Girlfriend Nazila's post in discussion | मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रामध्ये फुललं प्रेम? गर्लफ्रेंड नाझिलाची पोस्ट चर्चेत

मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रामध्ये फुललं प्रेम? गर्लफ्रेंड नाझिलाची पोस्ट चर्चेत

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे.  स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. मुनव्वर फारुकी आणि प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. 

 मुनव्वरचे नाव मन्नारा चोप्राशी जोडले जात असताना आता  मुनव्वरची गर्लफ्रेंड नाझिला हिने एक पोस्ट शेअर केली आहे. नाझिलाने लिहिले, 'मी एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्व काही जसे दिसते तसे नसते.  शुद्ध आणि परिपूर्ण दिसतात, तेवढे ते नसतात.  म्हणूनच असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या आयडल व्यक्तीला  कधीही भेटू नका कारण बर्‍याचदा तुमच्या विचारांप्रमाणे ते नसतात. त्यापेक्षा ते खूप वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही टीव्हीवर किंवा ऑनलाइन पहात असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये फसू नका'.

बिग बॉसच्या घरात मन्रारा आणि मुनव्वर यांच्यात चांगले ट्यूनिंग आहे. पहिल्या एपिसोडमध्ये दोघांमध्ये भांडण झाले होते, पण त्यानंतर त्यांचे बाँडिंग आणखी घट्ट झाले. तर मुनव्वर फारूखीच्या गर्लफ्रेंडचं नाव नाझिला सिताशी असं आहे. मुनव्वरची गर्लफ्रेंड नाझिला सिताशी ही एक मॉडेल, युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे. इन्स्टाग्रामवर नाझिलाचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 मुनव्वर फारुकी हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणाऱ्या मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला असून आता 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.
 

Web Title: Love blossomed between Munavwar Farooqui and Mannara Chopra? Girlfriend Nazila's post in discussion