Lock up: पूनम पांडेसोबत शिवम शर्माला करायचंय 'Hook Up'; लग्नाविषयी म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:28 IST2022-04-17T15:27:28+5:302022-04-17T15:28:52+5:30

Lock Upp: अलिकडेच या शोमध्ये शिवम शर्माला ‘Truth and Dare’ हा टास्क देण्यात आला होता. यात त्याने पूनम पांडेसह हूकअप करायला आवडेल असं सांगितलं.

lock upp contestant shivam sharma wants to hook up with poonam pandey | Lock up: पूनम पांडेसोबत शिवम शर्माला करायचंय 'Hook Up'; लग्नाविषयी म्हणाला...

Lock up: पूनम पांडेसोबत शिवम शर्माला करायचंय 'Hook Up'; लग्नाविषयी म्हणाला...

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) लॉक अप (Lock Upp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या कार्यक्रमात वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनात घडून गेल्या अनेक सिक्रेट्सचा खुलासा या कार्यक्रमात केला आहे. त्यामुळे हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. यामध्येच या शोमधील सर्वाधित चर्चेत येणाऱ्या शिवम शर्माने पूनम पांडेसह (Poonam Pandey) त्याला हूक अप (hook up) करायची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यामुळे सध्या शिवम चर्चेत आहे.

अलिकडेच या शोमध्ये शिवम शर्माला एक फनी टास्क देण्यात आला होता. ‘Truth and Dare’ या टास्कमध्ये शिवमला काही मजेदार चॅलेंज देण्यात आले. यात कपडे काढून त्याला मुलींसारखं डान्स करायला सांगितला. इतकंच नाही तर, या  शोमधील कोणत्या महिला कैदी स्पर्धकाला डेट करायला, हूकअप करायला आणि लग्न करायला आवडेल?  असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यामध्ये त्याने पूनम पांडेसह हुकअप करायला आवडेल, असं त्याने सांगितलं. इतकंच नाही तर यामागचं कारणही त्याने सांगितलं.

"मला पायलसोबत लग्न करायला आवडेल कारण ती एक उत्तम गृहिणी होऊ शकते असं वाटतं. तर, पूनम पांडेसह मला हूकअप करायला आवडेल. कारण, ती खूप छान दिसते", असं उत्तर शिवमने दिलं.शिवमचं हे उत्तर ऐकल्यावर एकता कपूरने त्याच्या चॉइसं कौतुक केलं. जर या दोघींसोबत तुझं सुत जुळलं तर तुझी लाईफ सेट होईल, असं एकता कपूर म्हणाली.

Web Title: lock upp contestant shivam sharma wants to hook up with poonam pandey