Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच 'लेस्बियन कपल' Engaged, नॅशनल TV वर प्रेमाची कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:11 IST2025-09-24T14:58:32+5:302025-09-24T15:11:48+5:30
'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच, एका लेस्बियन जोडप्याने टेलिव्हिजनवर संपूर्ण जगासमोर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.

Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच 'लेस्बियन कपल' Engaged, नॅशनल TV वर प्रेमाची कबुली!
Bigg Boss Malayalam Season 7: 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले आहे, जे देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. 'बिग बॉस मल्याळम'च्या घरात एका लेस्बियन जोडप्याने आपल्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आदिला आणि नूरा या दोघींनी शोच्या घरातच साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आदिला आणि नूरा यांच्यातील हा रोमँटिक क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सध्या 'बिग बॉस मल्याळम'चे सातवे सिझन सुरु आहे. आदिला आणि नूरा यांनी केवळ एकमेकींना अंगठ्याच घातल्या नाहीत. तर लिपलॉक कीस करून आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीही दिली. शोचे होस्ट मोहनलाल यांनी आदिला आणि नूरा यांचे अभिनंदन केलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
आदिला आणि नूरा यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर खूप वाद निर्माण झाला होता. त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले होते. आदिला आणि नूरा यांची मैत्री कॉलेजच्या दिवसांपासून आहे. बारावीत असताना त्यांची भेट सौदी अरेबियात झाली होती आणि तेव्हापासून त्यांची मैत्री प्रेमात कधी बदलली हे त्यांना कळलेच नाही. आता मात्र या दोघींनी संपूर्ण जगासमोर आपलं प्रेम जाहीर केलंय.