मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:26 IST2024-05-13T15:25:54+5:302024-05-13T15:26:58+5:30
फिल्मसिटीत याही आधी बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे.

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
सन मराठी वाहिनीवरील 'प्रेमास रंग यावे' मालिकेचे नुकतेच ४०० भाग पूर्ण झाले. मालिकेच्या सेटवर याचे सेलिब्रिशेनही करण्यात आले. सर्व कलाकार, टेक्निकल टीम यावेळी उपस्थित होती. दरम्यान सेटवर दहशतीचं वातावरही होतं कारण मध्यरात्री तिथे चक्क बिबट्याने एन्ट्री घेतली होती. बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
'प्रेमास रंग यावे' मालिकेचं शूटिंग गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये सुरु आहे. फिल्मसिटीत याही आधी बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. भरदिवसा किंवा मध्यरात्री कधीही बिबट्याची दहशत असते. गोरेगाव परिसरात अनेकदा बिबट्या फिरताना दिसला आहे. मालिकांच्या सेटवर तर हे अनेकदा घडलं आहे. याआधी काही मालिकांच्या सेटवर तारांबळ उडाली आहे. 'प्रेमास रंग यावे' मालिकेने नुकतेच 400 भाग पूर्ण केले. याचं जंगी सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनला बिबट्यानेही हजेरी लावली अशी चेष्टा नंतर टीमने केली.
सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे ही मालिका पटवून देते. अभिनेत्री अमिता कुलकर्णी आणि अभिनेता रोहित शिवलकर मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत.