हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:46 IST2023-09-05T15:46:05+5:302023-09-05T15:46:54+5:30

गोरेगाव फिल्म सिटीतील हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या आढळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

leopard entered in saubhagyavati bhav 2 set while shooting what happened | हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

गेल्या काही महिन्यात गोरेगाव फिल्म सिटीतील टीव्ही मालिकांच्या सेटवर बिबट्या आढळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. ‘नीरजा’, ‘मेरी सास भूत है’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांच्या सेटवर बिबट्या आढळल्याने गोंधळ उडाला होता. आता सौभाग्यवती भव: २ या हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याचं वृत्त आहे. सोमवारी(४ सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास मालिकेच्या सेटवर बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. यादरम्यान सेटवर काही क्रू मेंबर्स उपस्थित होतो. पण, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

याआधी ‘अजूनी’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला होता. त्याने एका कुत्र्यावर हल्ला करुन त्याचा फडशा पाडला होता. या घटनेनंतर कलाकार आणि सेटवरील कामगारांमध्ये भीतीचं वातावरण होतं. तसंच, त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेनंतर चार-पाच दिवस मालिकेचं शूटिंगही थांबविण्यात आलं होतं. हिंदी मालिका ‘गुम है किसी के प्यार मे’ च्या सेटवर अजगर तर ‘नागिण ६’च्या सेटवर साप आढळल्याचंही वृत्त होतं.

शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी

दरम्यान, ‘सौभाग्यवती भव:’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाइफ ओके या चॅनेलवर ही या मालिकेचा पहिला सीझन प्रसारित झाला होता. या मालिकेत श्रृती झा, करणवीर बोहरा, अमनदीप सिद्धू, धीरज धूपर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: leopard entered in saubhagyavati bhav 2 set while shooting what happened