लेक माझी दुर्गा: मालिकेतून वरदा पाटील आऊट; 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार दुर्गाच्या मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:24 IST2022-06-08T12:23:57+5:302022-06-08T12:24:49+5:30

Lek Mazhi Durga: अत्यंत सुशील, सुस्वभावी असलेल्या दुर्गाची भूमिका वरदाने उत्तमरित्या पार पाडली. त्यामुळे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.

Lek Mazhi Durga: Varada Patil out of the serial This popular actress will be seen in the lead role of Durga | लेक माझी दुर्गा: मालिकेतून वरदा पाटील आऊट; 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार दुर्गाच्या मुख्य भूमिकेत

लेक माझी दुर्गा: मालिकेतून वरदा पाटील आऊट; 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार दुर्गाच्या मुख्य भूमिकेत

काही दिवसांपूर्वीच कर्लस मराठीवर (Colors Marathi )  ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे हेमांगी कवी आणि सुशील इनामदार यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत वडिलांचा सतत तिरस्कार सहन करणाऱ्या दुर्गा आणि तिच्या आईची कहानी दाखवण्यात आली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकेतून आता दुर्गाने काढता पाय घेतला आहे. मात्र, आता तिच्या जागी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'लेक माझी दुर्गा' या मालिकेत अभिनेत्री वरदा पाटील (varda patil) ही दुर्गाची मुख्य भूमिका साकारत आहे. अत्यंत सुशील, सुस्वभावी असलेल्या दुर्गाची भूमिका वरदाने उत्तमरित्या पार पाडली. त्यामुळे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मात्र, आता या मालिकेतून वरदाने काढता पाय घेतला आहे. वरदाने ही मालिका सोडली असून तिच्या जागी एका लोकप्रिय अभिनेत्री दुर्गा या भूमिकेची जबाबदारी स्वीकारली आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वरदाच्या जागी अभिनेत्री रश्मी अनपट (rashmi anpat), दुर्गाची भूमिका साकारणार आहे. रश्मीने तिच्या इन्स्टाग्रामवर या मालिकेचा प्रोमो शेअर करत तिची पहिली झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये दुर्गाचं जयसिंगरावांसोबत लग्न होतांना दिसत आहे.

दरम्यान, रश्मी अनपट मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. रश्मीप्रमाणेच तिचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेचे सर्व कथानक दुर्गाभोवती फिरताना दिसतं. ही मालिका, 'शक्ती' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं जातं. 
 

Web Title: Lek Mazhi Durga: Varada Patil out of the serial This popular actress will be seen in the lead role of Durga