१३ वर्षांचा संसार, अजूनही मूल नाही; लीना भागवत-मंगेश कदम यांनी सांगितलं कारण, म्हणाले- "आमचं लग्न उशीरा झाल्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:48 IST2025-09-17T13:48:08+5:302025-09-17T13:48:42+5:30
लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. पण, अद्यापही त्यांना मूल नाही. खरं तर मूल न होऊ देण्याचा निर्णय लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी लग्नाआधीच घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.

१३ वर्षांचा संसार, अजूनही मूल नाही; लीना भागवत-मंगेश कदम यांनी सांगितलं कारण, म्हणाले- "आमचं लग्न उशीरा झाल्यामुळे..."
मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि आदर्श कपलपैकी एक म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. २०१२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी कायम एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला आता १३ वर्ष झाली आहेत. लग्नाच्या आधी काही वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. पण, अद्यापही त्यांना मूल नाही. खरं तर मूल न होऊ देण्याचा निर्णय लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी लग्नाआधीच घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.
लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नुकतीच द अनुरुप शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत लीना भागवत म्हणाल्या, "लग्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी आमच्या आधीच ठरल्या होत्या. मूल होऊ न देणं हे आमच्या दोघांचंही आधीच ठरलं होतं. कारण, आमच्या दोघांचंही नाटकावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला करियरमध्ये ब्रेक घ्यायचा नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाळाला काय सुरक्षितता देऊ शकणार आहोत? काय पद्धतीचं शिक्षण देणार आहोत? काय पद्धतीचं आयुष्य देणार आहोत? या सगळ्या गोष्टींचा विचार करता. आपण आता खरंच तेवढे सक्षम आहोत का? ज्या पद्धतीने आपल्या पालकांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या तसं देणं हे जरा व्यस्त प्रमाण आहे, असं लक्षात आलं. त्यामुळे आम्ही छान, शांतपणे एकत्र निर्णय घेतला. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि आम्ही छान पुढे गेलो".
त्यानंतर मंगेश कदम म्हणाले की "मला वाटतं की आमचं लग्न खूप उशीरा झालं. आणि त्यामुळे लग्नानंतर जर हिला मूल झालं असतं तर आणखी ३-४ वर्ष तिला काहीच करता आलं नसतं. आणि ते फार महत्त्वाचं होतं. मी म्हटलं की हे सगळं कशासाठी? तू आणि मी आपण आनंदासाठी एकत्र आलो आहोत. तर तुझा आनंद कशात आहे ते तू कर. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि असंही काय माझं आडनाव भोसले वगैरे नाही की जे पुढे चालत राहिलं पाहिजे. माझं आडनाव कदम आहे. कदम कदम बढाए जा... ते आरामात चालू राहिल".