'बिग बॉस मराठी ६' मध्ये 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री तन्वी कोलते आणि प्रसिद्ध अभिनेता आयुष संजीवची घरात एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:11 IST2026-01-11T21:06:01+5:302026-01-11T21:11:23+5:30
तन्वी कोकणातील आहे तर आयुष मुंबईचा आहे. घरात येताच तन्वी आणि आयुषची स्टेजवर भांडणं झाली आहेत. त्यामुळे रितेशला या दोघांचं भांडण थांबवावं लागलं.

'बिग बॉस मराठी ६' मध्ये 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री तन्वी कोलते आणि प्रसिद्ध अभिनेता आयुष संजीवची घरात एन्ट्री
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड प्रिमिअरला सुरुवात झाली आहे. रितेश देशमुख आधीच्या सीझनप्रमाणे या नव्या सीझनचंही सूत्रसंचालन करत आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या स्पर्धक दाखल होत आहेत. अशातच या स्पर्धकांमध्ये अभिनेता आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात दिमाखदार एन्ट्री झाली आहे. आयुष घरात आल्याने 'बिग बॉस मराठी ६' च्या या नव्या सीझनमध्ये खरी रंगत निर्माण होणार यात शंका नाही. आयुषसोबत तन्वी कोलतेने या घरात एन्ट्री घेतली आहे
आयुष संजीव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर आहे. आयुषने ३६ गुणी जोडी आणि बॉस माझी लाडाची या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आयुषला या मालिकांमधून भरपूर लोकप्रियता मिळाली. टेलिव्हिजन विश्वातील लाडका स्टार आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून आयुषच्या फॅन फॉलोईंगमध्येही प्रचंड वाढ झाली. आयुषच्या फिटनेसचे व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत असतात.
तन्वी कोलते ही मूळची कोकणाची आहे. तन्वीने लक्ष्मीनिवास मालिकेत काम केलं आहे. याशिवाय २०१८ मध्ये मिस रत्नागिरी आणि २०२० मध्ये मिस गोवा या सन्मानांनी तन्वीला गौरवण्यात आलं आहे. तन्वी आणि आयुषच्या खास परफॉर्मन्सने चार चाँद लावले. रितेशने तन्वीचं कौतुक केलं. आयुष आणि संजीव मेहनतीच्या जोरावर बिग बॉस मराठी ६ मध्ये आलेत. आयुषने बिग बॉस मराठीमध्ये बॅकग्राऊंड डान्सर काम केलं आहे, असाही खुलासा त्याने केलाय. घरात येताच तन्वी आणि आयुषची स्टेजवर भांडणं झाली आहेत. त्यामुळे रितेशला या दोघांचं भांडण थांबवावं लागलं.
आयुष संजीवने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तो 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात प्रवेश करण्याची हिंट दिली होती. पण आयुष खरंच 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाणार का, याविषयी सर्वजण साशंक होते. अखेर आयुषची आज 'बिग बॉस मराठी ६' मध्ये झकास एन्ट्री झाल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयुष 'बिग बॉस मराठी ६' गाजवणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेलच.