"माझ्या मेहनतीचा प्रवास...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, चाहत्यांसह कलाकारांनी केलं अभिनंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:08 IST2026-02-06T11:06:51+5:302026-02-06T11:08:15+5:30

सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली नवीन गाडी, दोघेही एकाच चॅनेलवर करतात काम,आनंद व्यक्त करत म्हणाले...

laxmi niswas serial fame actor anuj thakare buy new car share good news with fans   | "माझ्या मेहनतीचा प्रवास...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, चाहत्यांसह कलाकारांनी केलं अभिनंदन 

"माझ्या मेहनतीचा प्रवास...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, चाहत्यांसह कलाकारांनी केलं अभिनंदन 

Television Actor: आपल्या हक्काचं घर आणि फिरायला गाडी असावी,  असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी मालिकाविश्वात काम करणाऱ्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. या नायकाने नवीन गाडी खरेदी करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया...


'लक्ष्मी निवास' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अनेक कलाकार पाहायला मिळतात. तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अनुज ठाकरे.  दरम्यान, अनुज ठाकरे या मालिकेत हरिशच्या भूमिकेत दिसत आहे. लक्ष्मी व श्रीनिवास यांचा तो मुलगा आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनुज ठाकरेने मोठी भरारी घेत आता स्वत:ची गाडी घेतली आहे.

अभिनेता अनुज ठाकरेने टाटा पंच ही नवीन गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या साथीने या नव्या गाडीची पूजा देखील केली.अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या साथीने या नव्या गाडीची पूजा देखील केली. अनुजने ‘स्वप्न पाहिलं होतं…आज ते स्वतः चालवत आहे. ही फक्त गाडी नाही, हा प्रवास आहे माझ्या मेहनतीचा..’ म्हणत नव्या कारची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.दरम्यान, काजल काटे, विजया बाबर अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अनुजनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अभिनेता अनुज ठाकरेची पत्नी अश्विनी गोरले देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तारिणी मालिकेत काम करताना दिसते आहे. 

Web Title : 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता अनुज ठाकरे ने खरीदी नई कार, जश्न मनाया।

Web Summary : 'लक्ष्मी निवास' के लिए जाने जाने वाले अनुज ठाकरे ने नई टाटा पंच खरीदकर अपना सपना पूरा किया। उन्होंने अपनी पत्नी और प्रशंसकों के साथ खुशी का अवसर साझा किया, अपनी मेहनत का जश्न मनाया। साथी अभिनेताओं ने उनकी उपलब्धि पर बधाई दी। उनकी पत्नी, अश्विनी गोरले भी एक लोकप्रिय अभिनेत्री हैं।

Web Title : 'Lakshmi Niwas' actor Anuj Thakare buys new car, celebrates success.

Web Summary : Anuj Thakare, known for 'Lakshmi Niwas,' fulfilled his dream by purchasing a new Tata Punch. He shared the joyous occasion with his wife and fans, celebrating his hard work. Fellow actors congratulated him on his achievement. His wife, Ashwini Gorle, is also a popular actress.