"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:55 IST2026-01-12T10:54:20+5:302026-01-12T10:55:09+5:30

काल बिग बॉस मराठी ६ च्या घरात राधा पाटीलची एन्ट्री झाली. राधाने घरात आल्या आल्याच गौतमी पाटीलचं नाव घेत तिला चांगलंच डिवचलं आहे

lavani dancer Radha Patil slam Gautami patil while enter in bigg boss marathi 6 | "तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...

"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर काल संपन्न झाला. अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी ६'चा सूत्रसंचालक रितेश देशमुखने पुन्हा एकदा त्याच्या खास शैलीत 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात स्पर्धकांचं स्वागत केलं. या घरात एकापेक्षा एक 'धुरंधर' स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये महाराष्ट्राची लावणी डान्सर राधा पाटीलही सहभागी झाली होती. राधाने घरात आल्या आल्याच सबसे कातील अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलसोबत चांगलाच पंगा घेतला. काय म्हणाली राधा?

राधा पाटीलने गौतमीला डिवचलं

राधा पाटीलने खास डान्स करत 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री केली. त्यावेळी राधाच्या डान्सचं रितेशने कौतुक केलं. रितेशने त्यावेळी राधाला प्रश्न विचारला की, ''तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?.'' हे ऐकताच राधा म्हणाली, ''मला तरी वाटतं मीच आहे. असं मी खूप लोकांना पळवून लावलंय. जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव इकडे तिकडे गाजतंय त्यांना तर मी खूप आधीच पळवून लावलंय. आणि मी माझ्या टॅलेंटनुसार कोणाला घाबरत नाही. स्टेजवर समोर कोणीही आलं तरीही मी घाबरत नाही. मग ती गौतमी पाटील असो की कोणीही असो मी नाय घाबरत.''




राधाने केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. इतकंच नव्हे राधा आणि गौतमी यांच्यातील वाद सर्वांसमोर आला. आता राधा 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात कशी खेळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. राधाने पहिल्याच दिवशी तिच्या रोखठोक स्वभावाचा अनुभव सर्वांना दिला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राधा प्रेक्षकांचं मनोरंजन कशी करणार, हा कुतुहलाचा विषय आहे. 

Web Title : बिग बॉस मराठी 6 में राधा पाटिल ने गौतमी पाटिल को छेड़ा

Web Summary : राधा पाटिल ने बिग बॉस मराठी 6 में प्रवेश करते ही गौतमी पाटिल को चुनौती दी, अपने क्षेत्र में अपना प्रभुत्व जताया और विवाद खड़ा कर दिया।

Web Title : Radha Patil taunts Gautami Patil on Bigg Boss Marathi 6

Web Summary : Radha Patil entered Bigg Boss Marathi 6 and immediately challenged Gautami Patil, asserting her dominance in their field and sparking controversy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.