सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात, गौतमी पाटीलला राधाचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:47 IST2026-01-11T22:47:14+5:302026-01-11T22:47:53+5:30
महाराष्ट्राची लाडकी लावणी नृत्यांगना राधा पाटीलने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात शानदार एन्ट्री घातली आहे

सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात, गौतमी पाटीलला राधाचं खुलं आव्हान
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये महाराष्ट्राची सर्वांची आवडती लावणीसम्राज्ञी राधा पाटीलने एन्ट्री केली आहे. राधाने खास डान्स करत 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात सर्वांचं लक्ष वेधलं
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली राधा पाटील ही महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी आहे. राधाने महाराष्ट्रभरात तिच्या लावणीचे जाहीर कार्यक्रम केले आहेत. राधाची लावणी पाहायला महाराष्ट्रभरातून लोक गर्दी करतात. राधाने 'बिग बॉस मराठी ६'च्या मंचावर येताच गौतमी पाटीलला खुलं आव्हान केलं. त्यामुळे घरात आल्या आल्याच राधाचं विधान चर्चेचा विषय ठरलं.
रितेशने राधाचं खास अंदाजात स्वागत करुन तिला घरातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राधाने घरात एन्ट्री करताच सर्वांना नमस्कार करुन अभिवादन केलं. राधा पाटीलने घरात एन्ट्री केल्याने आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात कशी रंगत निर्माण होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. राधाचे चाहते तिला नक्कीच सपोर्ट करतील यात शंका नाही.