"आम्ही मामा झालो...", भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर कृष्णा-अलीचा आनंद गगनात मावेना, सेटच्या बाहेर वाटली मिठाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:50 IST2025-12-19T17:47:59+5:302025-12-19T17:50:10+5:30
भारतीची डिलिव्हरी झाल्यानंतर 'लाफ्टर शेफ'च्या कलाकारांनी सेटवर मिठाई वाटली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

"आम्ही मामा झालो...", भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर कृष्णा-अलीचा आनंद गगनात मावेना, सेटच्या बाहेर वाटली मिठाई
टेलिव्हिजन विश्वातून आज(१९ डिसेंबर) सकाळीच एक गुडन्यूज आली. 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. भारतीने गोंडस मुलाला जन्म दिला. तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 'लाफ्टर शेफ'च्या शूटआधी भारतीला प्रसुतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला दुसऱ्यांदा मुलगा झाला. भारती दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर 'लाफ्टर शेफ'च्या कलाकारांनीही आनंद व्यक्त केला आहे.
भारतीची डिलिव्हरी झाल्यानंतर 'लाफ्टर शेफ'च्या कलाकारांनी सेटवर मिठाई वाटली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन त्यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये 'लाफ्टर शेफ'चे कलाकार अली गोनी, ईशा मालवीय, जन्नत जुबैर, देबिना बॅनर्जी, तेजस्वी प्रकाश, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह दिसत आहे. कृष्णा आणि अली "आम्ही मामा झालो" असं म्हणत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कलाकार मिठाई वाटतानाही दिसत आहेत.
भारती अगदी डिलीव्हरीच्या दिवसापर्यंत शूटिंग करत होती. आज डिलीव्हरी झाल्याने 'लाफ्टर शेफ'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. भारती सिंह आणि हर्षने अद्याप अधिकृतरित्या गुडन्यूज जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर भारतीला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. भारती आणि हर्षने २०१७ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ३ एप्रिल २०२२ रोजी भारतीला पहिला मुलगा झाला होता. त्याचं नाव लक्ष्य असं आहे. त्याला प्रेमाने सगळे गोला असं म्हणतात. आता छोट्या गोलाला त्याच्याहून चिमुकला भाऊ मिळाला आहे.