विकी जैनवर भडकत अंकिता लोखंडेने मागितला घस्फोट, म्हणाली, 'मी तुझ्या घरी येणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 12:29 IST2023-12-21T12:29:08+5:302023-12-21T12:29:45+5:30

भांडणाची सुरुवात विकी आणि आएशा खानच्या यांच्यात चाललेल्या संवादावरुन झाली.

latest episode of bb17 ankita lokhande asked divorce to vicky jain after his conversation with ayesha khan | विकी जैनवर भडकत अंकिता लोखंडेने मागितला घस्फोट, म्हणाली, 'मी तुझ्या घरी येणार नाही'

विकी जैनवर भडकत अंकिता लोखंडेने मागितला घस्फोट, म्हणाली, 'मी तुझ्या घरी येणार नाही'

Ankita Lokhande Divorce: बिग बॉस 17 मध्ये सध्या अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) तर ऐश्वर्या-नील या दोन जोड्या आहेत. त्यात अंकिता-विकीमध्ये सतत काही ना काही कारणांवरुन खटके उडताना दिसतात. आता नुकत्याच झालेल्या एका भांडणात अंकिताने थेट घटस्फोटाचाच विषय काढल्याने सर्वांचे कान टवकारले आहेत. एका गोष्टीवरुन अंकिताला विकीचा एवढा राग आला की तिने 'मी तुझ्या घरी येणार नाही मला घटस्फोट दे' अशी थेट मागणी केली.

भांडणाची सुरुवात विकी आणि आएशा खानच्या यांच्यात चाललेल्या संवादावरुन झाली. दोघांनी लग्नावरुन जोक केला. लग्न झालेल्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं असं विकी म्हणाला. त्यातही पुरुषांना जास्त सहन करावं लागतं असंही तो म्हणाला. हे ऐकून अंकिता भडकली आणि म्हणाली,'जर तुला इतकं सहन करावं लागतंय तर मग का आहेस माझ्यासोबत? चल घटस्फोट घेऊ. मला तुझ्या घरी यायचं नाही.'

काही वेळाने अंकिता आयेशाला म्हणाली,'मला माहित आहे विकीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो मला हवं ते देत नाही. तो माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही पुरुष स्पर्धकासोबत माझं भांडण होतं तेव्हा तो दरवेळी मला थांबवतो हे मी पाहिलं आहे.'

काही दिवसांपूर्वीच अंकिताचा वाढदिवस बिग बॉसच्या घरात साजरा करण्यात आला. विकीन तिच्यासाठी खास कविता लिहिली होती. विकी आणि अंकिता 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अंकिता प्रसिद्धीझोतात आली होती.

 

Web Title: latest episode of bb17 ankita lokhande asked divorce to vicky jain after his conversation with ayesha khan