"सुंदर दिसणारी व्यक्ती शोधणं सोपं आहे, पण...", संजीव सेठशी घटस्फोटानंतर लता सबरवालची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:14 IST2025-06-26T13:11:11+5:302025-06-26T13:14:15+5:30

ऑनस्क्रीन नवरा बायकोची भूमिका साकारलेले लता आणि संजीव सेठ खऱ्या आयुष्यातही पती पत्नी होते. २०१० मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. मात्र आता लग्नानंतर १५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर लता सबरवालने इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

lata sabarwal shared criptic post after divorce with sanjeev seth | "सुंदर दिसणारी व्यक्ती शोधणं सोपं आहे, पण...", संजीव सेठशी घटस्फोटानंतर लता सबरवालची क्रिप्टिक पोस्ट

"सुंदर दिसणारी व्यक्ती शोधणं सोपं आहे, पण...", संजीव सेठशी घटस्फोटानंतर लता सबरवालची क्रिप्टिक पोस्ट

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री लता सबरवाल आणि संजीव सेठ यांचा घटस्फोट झाला आहे. ऑनस्क्रीन नवरा बायकोची भूमिका साकारलेले लता आणि संजीव सेठ खऱ्या आयुष्यातही पती पत्नी होते. २०१० मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. मात्र आता लग्नानंतर १५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर लता सबरवालने इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लता सबरवालने घटस्फोट घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता तिने पुन्हा क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. "सुंदर दिसणारी व्यक्ती शोधणं हे सोपं आहे पण, सुंदर हृदयाची माणसं शोधणं नाही", असं तिने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणते, "तुम्ही दुसऱ्यांना तेव्हाच सल्ला देऊ शकता जेव्हा तुम्ही स्वत: त्याचा अनुभव घेतलेला असेल". घटस्फोटानंतर लता सबरवालने केलेल्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, संजीव सेठ आणि लता यांनी एक मुलगादेखील आहे. लता सबरवालशी लग्न करण्याआधी संजीव सेठने मराठी अभिनेत्री रेशम टिपनीससोबत लग्नगाठ बांधली होती. पण, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचादेखील घटस्फोट झाला. रेशमपासून संजीव यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

Web Title: lata sabarwal shared criptic post after divorce with sanjeev seth