'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:20 IST2025-02-08T16:17:23+5:302025-02-08T16:20:23+5:30
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील कलाकाराने नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..."
'लाखात एक आमचा दादा' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील कलाकाराने नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत जिमसीनाची भूमिका साकारणारा अभिनेता शुभम पाटील याने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. शुभमने वाढदिवशी स्वत:लाच हे खास गिफ्ट दिलं आहे. शुभमने ह्युंडई कंपनीची क्रेटा कार खरेदी केली आहे. याची किंमत सुमारे १३ लाखांच्या घरात आहे. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर शुभम गणपती मंदिरात गेला होता. नव्या गाडीचे फोटो त्याने शेअर केले आहेत. "भाई नवी गाडी...गणराया सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
शुभमच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, 'लाखात एक आमचा दादा' मालिकेआधी शुभम तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत झळकला होता. त्याने काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. क्राइम पेट्रोल या लोकप्रिय क्राइम सीरिजमध्ये तो दिसला होता. त्याने अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.