ऋतुजा बागवेनंतर 'या' मराठी अभिनेत्याचं हॉटेल व्यवसायात पदार्पण, साताऱ्यात 'या' ठिकाणी भव्य उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:10 IST2025-08-11T12:09:30+5:302025-08-11T12:10:14+5:30
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने साताऱ्यात स्वतःचं हॉटेल उघडलं आहे. यामुळे अनेकांनी त्याचं अभिनंदन केलंय

ऋतुजा बागवेनंतर 'या' मराठी अभिनेत्याचं हॉटेल व्यवसायात पदार्पण, साताऱ्यात 'या' ठिकाणी भव्य उद्घाटन
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋतुजा बागवेने 'फूडचं पाऊल'च्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ऋतुजाचं सर्वांनी अभिनंदन केलं. अशातच आता ऋतुजा बागवेनंतर आणखी एका मराठी कलाकाराने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय. हा अभिनेता आहे नितीश चव्हाण. 'लागीरं झालं जी' या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नितिश चव्हाणने साताऱ्यात या खास ठिकाणी स्वतःचं हॉटेल सुरु केलंय. जाणून घ्या
नितीश चव्हाणने साताऱ्यात उघडलं हॉटेल
नितिश चव्हाणने साताऱ्यात स्वतःचं उघडं केलं आहे. नितिशने स्वतःच्या हॉटेलचे भव्य उद्घाटन साताऱ्यात केलं आहे. 'आजोळ-चव मामाच्या गावाची' या नावाने हे हॉटेल सुरु केलंय. सातारा येथील कुंभारवाडा, शाहूचौक येथे नितीश चव्हाणने हे हॉटेल उघडलं आहे. नितीशने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. नितीशच्या या हॉटेलमध्ये अस्सल मराठमोळे पदार्थ खायला मिळतात. मिसळ, कोथिंबीर वडी, चहा, थालीपीठ असे चविष्ट पदार्थ नितीशच्या या हॉटेलमध्ये मिळतात.
नितीश चव्हाण हा सध्या 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत काम करत आहे. या मालिकेत नितीश सूर्याची भूमिका साकारत आहे. या मालिकेआधी नितीशला 'लागिरं झालं जी' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर या दोघांची जोडी चांगलीच गाजली. नितीशने या मालिकेत फौजी आज्याची भूमिका साकारली होती. नितीश चव्हाणने हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याने अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय.