टीआरपी गडगडला! अवघ्या ७ महिन्यांतच लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला; मुख्य अभिनेत्रीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:36 IST2025-05-19T11:27:24+5:302025-05-19T11:36:16+5:30
अवघ्या ७ महिन्यांतच लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला; मुख्य अभिनेत्रीची भावुक पोस्ट

टीआरपी गडगडला! अवघ्या ७ महिन्यांतच लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला; मुख्य अभिनेत्रीची भावुक पोस्ट
Lai Aavdtes tu Mala: सध्या मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी टीआरपीला प्रचंड महत्व दिलं जातं. त्यामुळे अनेक मालिका वर्षभरातच बंद होताना दिसतात. ज्या मालिकांच्या टीआरपीचा आलेख चढता असतो त्या मालिका वर्षानुवर्ष टिकून राहतात. अलिकडेच कमी टीआरपी अभावी अनेक मालिकांनी बंद झाल्या आहेत. अशातच आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर लई आवडतेस तू मला ही मालिका सुरु करण्यात आली. सानिका आणि सरकार यांची अनोखी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एका सरळ रेषेत चालणाऱ्या आयुष्याचं, समाजाचं, हाडा-मासाच्या लोकांचं, त्यांच्या प्रेमाचं सत्य मांडणारी ही मालिका अवघ्या ७ महिन्यात मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या मालिकेतील सानिका पाटीलची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सानिका मोजार हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या माहितीला दुजोरा दिला आहे. "सानिका निरोप घेत आहे..., शूट पूर्ण झालं आहे. सानिकाचा प्रवास जगल्याबद्दल कृतज्ञ आहे. तिची ताकद, तिचे दोष, तिच्या नजरेतील अंगार ती नेहमीच माझा आयुष्याचा एक भाग राहील. तिला दिलेल्या प्रत्येक प्रेमाबद्दल आणि या सुंदर प्रवासाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद...", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच अभिनेता तन्मय जक्काने यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट दिली होती.
त्यामुळे आता अवघ्या ७ महिन्यातच या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे निश्चित झालं आहे. दरम्यान, लई आवडतेस तू मला मालिका निरोप घेणार असल्याचं कळताच प्रेक्षक नाराज झाले आहेत. अभिनेत्री सानिका मोजारने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "सानू तू खूप चांगलं काम केलं आहेस. आता आणखी एक नवी संधी तुझी वाट पाहत आहे...", तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय, "एवढी छान मालिका होती, शेवट असा दाखवला नको पाहिजे होता."