अखेर राघवला मिळाली रिअल लाइफ सिंधू; थाटात पार पडला संकेत-सुपर्णाचा लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:13 IST2023-04-23T16:11:29+5:302023-04-23T16:13:37+5:30
Sanket pathak:संकेत आणि सुपर्णा यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

अखेर राघवला मिळाली रिअल लाइफ सिंधू; थाटात पार पडला संकेत-सुपर्णाचा लग्नसोहळा
Sanket Pathak Wedding: लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक (Sanket Pathak) आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
संकेत आणि सुपर्णा यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचाही समावेश होता. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर संकेत-सुपर्णाच्या लग्नापूर्वीच्या विधींची चर्चा रंगली होती. अगदी मेहंदी, हळद या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या दोघांनी थाटात लग्नगाठ बांधली आहे.
दरम्यान, संकेत आणि सुपर्णा यांचं लव्हमॅरेज असून दुहेरी या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. फोटोशूटसाठी सुपर्णा तिच्या मेकअप रुममध्ये तयार होत होती. त्याचवेळी आपल्यासोबत कोणती अभिनेत्री फोटोशूट करणार हे पाहण्यासाठी संकेत एका असिस्टंटसोबत तिच्या रुममध्ये आला होता. पण, सुपर्णा काम असल्यामुळे तिने दरवाजा बंद केला. पण, या वेळात तिची संकेतसोबत नजरा नजर झाली होती. आणि, याच भेटीतून पुढे ते प्रेमात पडले.