"सगळेजण मला सेटवरून हकलून देतात", लागिरं झाली जी फेम जयडीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:00 IST2022-04-14T16:07:38+5:302022-04-14T19:00:49+5:30
छोट्या पड्यावरील 'लागिर झालं जी' मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती.

"सगळेजण मला सेटवरून हकलून देतात", लागिरं झाली जी फेम जयडीचा खुलासा
छोट्या पड्यावरील 'लागिर झालं जी' मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. मालिकेतील अजिंक्य आणि शीतली यांच्या जोडी प्रमाणेच मामी आणि जयडी यादेखील लोकप्रिय झाली. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील कलाकारांना लोक आजही त्याच नावाने ओळखतात. यामालिकेत जयडीची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा शिंदे सध्या जीव माझा गुंतला मालिकेत काम करते आहे. तिने नुकताच सेटवरचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे.
'लागिर झालं जी' फेम जयडी सध्या कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या श्वेताची निगेटिव्ह भूमिका साकारते आहे. अंतराच्या बहिणीचे म्हणजेच श्वेताची भूमिका साकारत आहे. श्वेता मल्हारची पत्नी होण्याचे स्वप्न मालिकेत पाहत असते. तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडते आहे. नुकतचा पूर्वा शिंदेने एक वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने 'जीव माझा गुंतला' मालिकेच्या सेटवर घडणाऱ्या किस्स्यांबद्दल खुलासे केले आहेत.
पूर्वा शिंदे ही गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, टेलिव्हीजन या माध्यमांमध्ये काम करते आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मालिकांमध्ये जरी मी नेगेटीव्ह भूमिका साकारत असले तर वैयक्तिक आयुष्यात मी फार चांगली आहे. अनेक वेळा लोक मला भेटण्यासाठी नकार देतात, मात्र एकदा भेटल्यानंतर मालिकेमधील माझी नेगेटीव्ह भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील मी यातील फरक त्यांना कळतो मग त्यांचा हा गैरसमज दूर होतो.
मालिकेतील तुझा सर्वात आवडता मित्र कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, माझी सगळ्यांसोबत मैत्री जमते. बेस्टफ्रेंड असा कुणीही नाही. अंतरा ही मालिकेप्रमाणेच तिच्या आयुष्यात देखील थोडी लाजरी बुजरी असल्याचे तिने सांगितले.
सेटवर सगळ्यात जास्त धमाल-मस्ती कोण करते असा प्रश्नदेखील तिला यावेळी विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, मीच सगळ्यात जास्त मस्ती करते, बाकी सगळे शांत असतात. त्यामुळे माझं पॅकअॅप झालं की सगळेजण मला सेटवरून हलकवतात आणि घरी जायला सांगतात.''
पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे. पूर्वा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.