तुलसी बदलली पण मिहीर अजूनही तसाच, समोर आली पहिली झलक, म्हणाला- "खूप दिवसांनी मी स्मृतीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:17 IST2025-07-22T18:15:54+5:302025-07-22T18:17:30+5:30
पुन्हा 'क्योंकी सास कभी बहु थी'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील तुलसीचं नवं रुप चाहत्यांनी प्रोमोमध्ये बघितलं होतं. आता मिहीरची झलकही समोर आली आहे.

तुलसी बदलली पण मिहीर अजूनही तसाच, समोर आली पहिली झलक, म्हणाला- "खूप दिवसांनी मी स्मृतीला..."
टेलिव्हिजन विश्वात इतिहास रचलेल्या 'क्योंकी सास कभी बहु थी' या मालिकेचा तब्बल २५ वर्षांनी सीक्वल येतोय. जवळपास ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला होता. आता पुन्हा 'क्योंकी सास कभी बहु थी'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील तुलसीचं नवं रुप चाहत्यांनी प्रोमोमध्ये बघितलं होतं. आता मिहीरची झलकही समोर आली आहे.
'क्योंकी सास कभी बहु थी' मालिकेत मिहीरची भूमिका अभिनेता अमर उपाध्यायने साकारली होती. या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेच्या सेटवरील नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिहीरची झलक पाहायला मिळत आहे. अजूनही अभिनेता आहे तसाच दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. मिहीरचा फिटनेसही अगदी तसाच असल्याचं दिसत आहे.
स्टार प्लसच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अमर उपाध्यायने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो, "या मालिकेचा दुसरा भाग येईल असा कधीच विचार केला नव्हता. यावर विश्वास बसत नाहीये. एवढ्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणणं आणि असा आयकॉनिक शो पुन्हा करणं ही मोठी गोष्ट आहे. जेव्हा मला फोन आला तेव्हा माझा विश्वासच बसत नाहीये. मला वाटलं की मस्करी करत आहेत. मी सर्वात आधी विचारलं की स्मृती तुलसीची भूमिका करणार आहे का? मिहीरच्या भूमिकेत त्यांना मी हवा होतो. खूप दिवसांनी मी स्मृतीला भेटणार आहे. आम्ही चांगले मित्र आहोत".