१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे 'ये रिश्ता..' फेम अभिनेत्री, लग्नाच्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:10 IST2024-10-19T15:10:10+5:302024-10-19T15:10:43+5:30
गेल्या काही दिवसांपासून शिवांगीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या कुशल टंडनला शिवांगी डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता कुशलने शिक्कामोर्तब केलं आहे.

१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे 'ये रिश्ता..' फेम अभिनेत्री, लग्नाच्या चर्चांना उधाण
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. या मालिकेतील अक्षराच्या भूमिकेने शिवांगीला लोकप्रियता मिळवून दिली. गेल्या काही दिवसांपासून शिवांगीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या कुशल टंडनला शिवांगी डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता कुशलने शिक्कामोर्तब केलं आहे.
कुशलने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रेमाची कबुली दिली आहे. कुशलने शिवांगीला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. त्याबरोबरच लग्नाच्या चर्चांवरही त्याने भाष्य केलं आहे. "मी सध्या लग्नाचा विचार करत नाहीये. पण, मी प्रेमात आहे. आम्ही सध्या वेळ घेत आहोत. माझ्या आईला माझं लग्न झालेलं बघायचं आहे. तिने ठरवलं तर ती माझं आजही लग्न लावून देईल. पण, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मुलगी शोधणं सोडून दिलं आहे", असं कुशल म्हणाला.
शिवांगी आणि कुशल हिंदी टेलिव्हिजनचे लोकप्रिय चेहेरे आहेत. एक हजारो मे मेरी बहना है या मालिकेतून कुशलला प्रसिद्धी मिळाली. शिवांगी आणि कुशलने बरसातें : मौसम प्यार के या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेदरम्यानच त्यांच्यातील जवळीक वाढली. कुशल आणि शिवांगीमध्ये १४ वर्षांचं अंतर आहे.