पत्नीशिवाय एकटा पडलाय कुशल; जुने दिवस आठवून झाला भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:57 IST2023-07-14T14:56:34+5:302023-07-14T14:57:01+5:30
kushal badrike: सध्या सुनयना 'मुघल ए आजम' या महानाट्याच्या प्रयोगासाठी अमेरिकेत आहे.

पत्नीशिवाय एकटा पडलाय कुशल; जुने दिवस आठवून झाला भावुक
छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत कुशलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कुशल उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक कवीदेखील आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्याचे सुकून या नावाने रचलेले कोट्स व्हायरल होत असतात. सध्या त्याने त्याच्या पत्नीच्या आठवणीत चार ओळी लिहिल्या आहेत. ज्या चर्चेत येत आहेत.
कुशलची पत्नीदेखील त्याच्याप्रमाणेच एक कलाकार आहे. सुनयना असं त्याच्या पत्नीचं नाव असून ती कथक नृत्यांगना आहे. सध्या सुनयना 'मुघल ए आजम' या महानाट्याच्या प्रयोगासाठी अमेरिकेत आहे. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून ती कुटुंबापासून दूर आहे. विशेष म्हणजे पत्नीचा हा दुरावा कुशलला सहन होत नसून तो वरचेवर तिच्या आठवणीत पोस्ट शेअर करत आहे.
इस बार “चायपर” मिलेंगेना, तो हम अपनी बात करेंगे !! :- सुकून, असं कॅप्शन देत कुशलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सुनयनासोबतचे अनेक फोटो कोलाज केले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.