'खतरों के खिलाडी १५' मधील कन्फर्म स्पर्धकाचं नाव उघड, 'हा' लोकप्रिय अभिनेता घेणार एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:12 IST2025-04-07T10:12:26+5:302025-04-07T10:12:54+5:30

'खतरों के खिलाडी' १५ व्या सीझनबद्दल आता एक नवीन अपडेट आलं आहे.

Kundali Bhagya's Shaurya Aka Baseer Ali Is Confirm Contestant Of Rohit Shetty Show Khatron Ke Khiladi 15 | 'खतरों के खिलाडी १५' मधील कन्फर्म स्पर्धकाचं नाव उघड, 'हा' लोकप्रिय अभिनेता घेणार एन्ट्री!

'खतरों के खिलाडी १५' मधील कन्फर्म स्पर्धकाचं नाव उघड, 'हा' लोकप्रिय अभिनेता घेणार एन्ट्री!

News About Khatron Ke Khiladi: 'खतरों के खिलाडी' हा अनेक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक आहे. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभाग घेतात. आता लवकरच 'खतरों के खिलाडी' चा १५ वा सीझन सुरू होत आहे.  या नव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान आता काही नावं हळूहळू समोर येत आहेत.  यातच कन्फर्म असलेली तीन लोकप्रिय नाव समोर आली आहे.

'खतरों के खिलाडी' १५ व्या सीझनबद्दल आता एक नवीन अपडेट आलं आहे. तिसऱ्या कन्फर्म स्पर्धकाचं नाव उघड झालं आहे. याआधी 'बिग बॉस १८' मधील लोकप्रिय स्पर्धक ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा ही दोन नाव निश्चित झाली होती. ईशा आणि अविनाशनंतर तिसरा निश्चित असलेला स्पर्धक हा अभिनेता बसीर अली हा आहे.  पण, याबाबत अद्याप बसीर अली किंवा 'खतरों के खिलाडी' टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


बसीर अली हा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने 'स्प्लिट्सव्हिला सीझन १०'ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. याशिवाय, तो 'रोडीज रायझिंग' आणि 'एस ऑफ स्पेस २' सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसला आहे. त्याला खरी ओळख 'कुंडली भाग्य' या मालिकेतून मिळाली होती. ज्यामध्ये त्याने शौर्य लुथ्राची भूमिका साकारली होती. बसीर अली  सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. त्याला इंस्टाग्रामवर १.३ दशलक्ष लोक फॉलो करतात. 

'खतरो के खिलाडी'चा आता १५ वा सीझन असणार आहे. 'खतरों के खिलाडी' हा शो गेल्या १७ वर्षांपासून छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. आतापर्यंत या शोमध्ये टीव्हीवरील अनेक लोकप्रिय चेहरे झळकले. त्यांनी शोमधून बक्कळ कमाईही केली. या शोचा  १५ वा सीझन हा येत्या २७ जुलै २०२५ पासून प्रसारित होण्याची अपेक्षा आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही आंतरराष्ट्रीय ठिकाणी शोचं शुटिंग होईल. गेल्यावर्षी 'खतरो के खिलाडी'च्या १४ व्या सीझनचं शुटिंग हे रोमानियामध्ये झालं होतं. 

Web Title: Kundali Bhagya's Shaurya Aka Baseer Ali Is Confirm Contestant Of Rohit Shetty Show Khatron Ke Khiladi 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.